अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. साखर कारखान्याच्या माध्यमातून हा पाय अहमदनगर जिल्ह्यात रोवला गेला. त्यानंतर काळाच्या ओघात अनेक खासगी साखर कारखानेही उभे राहिले.
साखर व ऊस उत्पादनाच्या बाबतीत अहमदनगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. दरम्यान आता एका मोठ्या वृत्तपत्राने अशी बातमी दिली आहे की, साखर प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या ९ साखर कारखान्यांची लाखोंची ‘बँक हमी’ जप्त करण्याबाबतचे पत्र निघालेले आहे. व हे पत्र सदर वृत्तपत्राच्या हाती लागले आहे. या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनंतर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेनुसार ही बातमी देण्यात आली आहे.
त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या पत्रानुसार, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने प्रादेशिक अधिकारी, नाशिक यांच्याकडे तसे पत्र पाठविल्याचे दिसले आहे. जिल्ह्यातील औद्योगिक विभागातील विविध कंपन्या, वेगवेगळी कारखाने सुरू करताना किंवा कार्यरत ठेवताना त्यांना प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आवश्यक परवान्यासह निर्धारीत केलेली ‘बँक हमी’ प्रदुषण मंडळाकडे ठेवावी लागते.
संबंधितांना प्रदुषण नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागते. याचे पालन न झाल्यास प्रदुषण नियामक मंडळ बँक हमी जप्त करू शकते. जिल्ह्यात उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दोन क्षेत्र अधिकाऱ्यांनी काही साखर कारखाने आणि उद्योगांची पाहणी केली. यात प्रदुषण कंट्रोल युनिटच्या निरीक्षणात काही असमतोल ठेवणाऱ्या बाबी निदर्शनास आल्या.
त्यानुसार जिल्ह्यातील चंद्रशेखर घुले यांचा ज्ञानेश्वर, प्रताप ढाकणे यांचा केदारेश्वर, आशुतोष काळे यांचा कोळपेवाडी, राजेंद्र नागवडे यांचा सहकारमहर्षी नागवडे, विवेक कोल्हे यांचा कोपरगाव, भानुदास मुरकुटे यांचा अशोक, राहुल जगताप यांचा कुकडी आणि विखे यांचा प्रवरानगर,
जयश्रीराम या कारखान्यांची बँक हमी जप्त करण्याबाबतचे एप्रिल २०२४ मधील एक पत्र या वृत्तपत्राच्या हाती लागले असल्याचे हे वृत्त या वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान प्रदूषण नियामक मंडळाच्या स्कॉडने मध्यंतरी अचानक पाहणी केली. मात्र त्यात कोणत्या त्रुटी आहेत,
याबाबत माहिती दिलेली नाही. तसेच बँक हमी जप्तीबाबत अद्याप आम्हाला नोटीस मिळालेली नाही अशी माहिती एका कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी दिली असल्याचे समजते. दरम्यान यात किती तथ्य आहे हे सध्या तरी माहिती नाही. या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनंतर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चेनुसार ही बातमी देण्यात आली आहे.