अहमदनगर बातम्या

अहमदनगरमधील नगरपालिकेच्या कचरा डेपोत आढळलेले हाडांचे सांगाडे नेमके कुणाचे? नागरिक आक्रमक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शहरानजीक संवत्सर हद्दीत असलेल्या एका भागात येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोत स्लॉटर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हाडांचे सांगाडे, शिंगे, मासांचा साठा आढळला असून हे अवशेष गोवंश जनावरांचे असल्याचा आरोप येथील गोरक्षकांनी केला आहे.

याबाबत गुन्हा दाखल करण्यासंबंधित अधिकाऱ्यांची चालढकल सुरू असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दि.३० जून रोजी दुपारच्या सुमारास शहरानजीक असलेल्या एका भागात येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोत स्लॉटर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हाडांचे सांगाडे, शिंगे, चरबी, मांसाचा साठा असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता ते अवशेष गोवंश जनावरांचे असल्याचा त्यांनी दावा करत संताप व्यक्त केला.  ही माहिती तालुक्यात पसरताच रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोरक्ष, गोप्रेमी व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी नगरपालिका प्रशासनाबाबत संताप व्यक्त करीत तेथे ठिय्या दिला.

माहिती मिळताच वया प्रकारचे गांभीर्य ओखळून शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर होत या ठिकाणाची पहाणी केली. तसेच याबाबत मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याशी चर्चा केली असता, रात्री उशीरा पालिकेच्या आरोग्य खात्यातील चव्हाण यांनी घटनास्थळी येत सदर हाडांचे सांगाडे अवशेषांची पाहणी केली आहे.

यावेळी गोरक्षकांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. हाडांचे अवशेष, सांगडेची तपासणीसाठी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप दहे यांना बोलविले होते. डॉ. दहे यांनी घटनास्थळी येऊन पाहाणी करत सर्व हाडांचे, मांसाचे नमुने कशाचे आहे. हे तपासणी करण्यासाठी जमा करून नेले आहे.

शहरातील आयेशा कॉलनी भागात वर्षानुवर्ष कत्तलखाने सुरू होते. ते नुकतेच पालिका व पोलीस प्रशासनाने हटवले आहेत. तरीही जनावरांच्या कत्तली सुरूच आहेत. त्यामुळे गोरक्षक व प्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahmednagarlive24 Office