भावाची मुलगी बहिणीने सून केली, त्यानंतर.. बलात्कारासह पोक्सोचा पाचजणांवर गुन्हा, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकरण

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भावाची मुलगी बहिणीने सून म्हणून घरात आणली. त्यानंतर ती काही दिवसानंतर गर्भवती राहिली. परंतु त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होत गेला अन सगळेच गोत्यात आले.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भावाची मुलगी बहिणीने सून म्हणून घरात आणली. त्यानंतर ती काही दिवसानंतर गर्भवती राहिली. परंतु त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होत गेला अन सगळेच गोत्यात आले.

मुलीचे वय कमी असताना तिचे लग्न लावण्यात आले असून यातून ती गर्भवती राहिली. दरम्यान, बाल विवाह लावणाऱ्या भटजीचा पोलिस शोध घेत आहेत. त्याचे झाले असे, लोणी येथील एका रुग्णालयात बाळंतपणासाठी गेलेल्या विवाहितेचे वय कमी असल्याचे

डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या जबाबावरून घारगाव पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील रहिवासी असणाऱ्या मुलीच्या नवऱ्यासह सासू-सासऱ्यांवर आणि पीडित मुलीच्या आई-वडिलांवर बलात्कार, बालविवाह प्रतिबंध आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सुमारे दीड वर्षापूर्वी पठार भागातील एका गावातील कुटुंबाने आपल्याच नात्यातील मुलगी सून करून आणली. भावाची मुलगी बहिणीने सून म्हणून घरात आणल्यानंतर ती काही दिवसांनी गर्भवती राहिली. तीन ते चार दिवसांपूर्वी तिला लोणी येथे रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल केले असता,

कागदपत्रे आणि इतर बाबींवरून सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे आणि तिचे लग्न करण्यात आले असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी पोलिसांना ही घटना कळवली. दरम्यान, गर्भवती मुलीला मुलगीदेखील झाली.

घारगाव पोलिसांनी सदर मुलीचा जबाब घेतला. आत्याच्या मुलाशी विवाह केला असून, घराच्या दारासमोरच मंडप टाकून हा विवाह करण्यात आला असल्याचे तिने सांगितले.

परंतु सदर मुलीचे वय कमी असल्याने त्या मुलीचा नवरा, सासू आणि सासऱ्यांसह मुलीच्या आई- वडिलांवर घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe