तरुणाचा निर्घृण खून, अनैतिक संबंधाच्या संशयावरून अपहरण करत मारले ! अहमदनगर हादरले

अहमदनगर जिल्ह्यातून 28 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून आधी अपहरण व नंतर खून असा थरार रंगला असल्याची माहिती समजली आहे.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून 28 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून आधी अपहरण व नंतर खून असा थरार रंगला असल्याची माहिती समजली आहे.

ही घटना कोपरगाव शहरात घडली आहे. सोहेल हारून पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान यानंतर मयताचे नातेवाईक आक्रमक झाले होते.

त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून तिघे फरार झाले आहेत. समजलेली अधिक माहिती अशी : काल रात्रीच्या सुमारास सदर मृत तरुण सोहेल याचे अपहरण केले गेले.

त्यानंतर त्यांस आरोपींकडून जबर मारहाण देखील झाली असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. जे आरोपी आहेत त्यांना सोहेलवर अनैतिक संबंधाचा संशय होता. त्यातूनच त्यांनी सोहेल पटेल याचे काल (रविवार) अपहरण केले.

त्यानंतर या आरोपींनी सोहेलला जबर मारहाण केल्याने या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर सोहेलच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस ठाण्यासमोरचं ठिय्या आंदोलन केले.

आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण
हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठाण मांडत विविध आरोप केले. ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून तिघे फरार झाले आहेत.

एकंदरीत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सध्या फरार संशयितांचा कसून शोध घेत आहेत.कोपरगाव शहरात या हत्याप्रकारामुळे तणावाचे वातावरण होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe