Ahmednagar News : सध्या अहमदनगर जिल्ह्यात शेअर मार्केट व त्या संबंधित गोष्टींमुळे खळबळ उडालेली असतानाच शेवगाव तालुक्यातील युवा उद्योजक तथा शेअर मार्केट व्यावसायिक यास यांना चाकूचा धाक दाखवून खंडणी मागितली. तू खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे. आम्हाला दर महिन्याला सात लाख रुपये हप्ता दे, नाहीतर तुझा मर्डर करू व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू.
आमच्या नादी लागू नको, आम्हीफार मोठे गुन्हेगार आहोत तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज करून तुझी बदनामी करून तुला सळो की पळो करून सोडू, असे म्हणत खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. या प्ररकणी नेवासा तालुक्यातील दोन व्यक्ती विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मी शेअर मार्केट ट्रेडिंग व शेती हा व्यवसाय करीत असून दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी मी पपईच्या बागेत काम करत असताना नेवासा तालुक्यातील दोघे माझ्याजवळ हातात चाकू घेऊन आले व मला चाकू दाखवून म्हणाले की, तु खूप ट्रेडिंग करून लोकांकडून पैसा गोळा केला आहे. तु खूप मोठा झाला आहे
तु आम्हा दोघांना दर महिन्याला खंडणी स्वरूपात सात रुपये हप्ता चालू कर. तु आम्हाला हप्ता दिला नाही, आम्ही तुला सळो की करून सोडू व तुझ्या विरोधात सर्व कार्यालयात अर्ज तुझी बदनामी करून असे ते म्हटल्यावर मी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. जाताना मला म्हणाले की, आम्ही खूप मोठे आहोत.
आमच्या नादी लागु नको तुला केव्हाच संपवून टाकू असे म्हणून ते निघून गेले. परंतु, भीती पोटी मी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर दोघांनी शेवगाव पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या सह इतर कार्यालयात माझ्या विरोधात अर्ज दिले. तसेच दिल्यानंतर नंतर त्यांनी मला वेळो वेळी फोनवर तसेच व्हाट्सअप कॉल वरती पैशाची मागणी केली.
तसेच पैशाची वेळेत पूर्तता नकेल्यास तुला व तुझ्या फॅमिलीला संपवणार तसेच तुझ्या विरोधात आणखीन खोटे अर्ज करणार. तसेच तु आमच्या विरोधात कोठेही कंप्लेंट कर आम्ही सर्व पोलीस मॅनेज केले आहेत, असे धमकीचे मेसेज व्हाट्सअप वरती दिले. तसेच पोलिस आमचे काहीच करू शकत नाही. आमची एसपी ऑफिसपर्यंत सेटिंग आहे, अशी देखील धमकी दिल्याने नेवासा तालुक्यातील दोन व्यक्तींविरोधात शेवगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.