अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये कार-दुचाकीचा अपघात, वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघताच्या घटना सुरूच असून आता आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कार-दुचाकीचा भीषण अपघत होऊन यात एक ठार तर एक जखमी झाले आहे. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील आगसखांड फाटा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. २६) सकाळी झाला.

दुचाकीवरून पितापुत्र चालले होते. त्यांना कारची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघात होऊन दुचाकीवरील वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

कार-दुचाकीमध्ये हा अपघात झाला. रोहिदास माधव वनवे (वय ५२), असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. मुलगा अविनाश रोहिदास वनवे (वय २४, रा. खडकवाडी, ता. आष्टी, जि. बीड) हा गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

रोहिदास वनवे व मोठा मुलगा अविनाश वनवे हे बापलेक दुचाकीवरून पाथर्डी तालुक्यातील अकोले गावच्या रस्त्यावरून आगसखांड गावाकडे कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्यावेळी खरवंडी कासारकडून भरधाव कार त्यांच्या दुचाकीला धडकली.

त्यामध्ये रोहिदास वनवे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश वनवे गंभीर जखमी झाले. यापूर्वी मृत रोहिदास वनवे यांचा लहान मुलगा अशोक वनवे हा आपल्या मूळ गावी येत असताना त्याचाही अपघात झाला आहे. वनवे कुटुंबावर या अपघाताने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहिदास वनवे यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसते. बेजबाबदारपणे अनियंत्रित वाहने चालवणे, रस्त्यांची दुरवस्था आदी कारणे अपघाताला कारणीभूत आहेत. यातील मृतांची संख्या देखील चितांजनक आहे.

 

Ahmednagarlive24 Office