Ahmednagar News : आषाढीनिमित्त श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षी पायी दिंडीद्वारे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि परत पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा होत असतो. या सोहळ्यामध्ये सुमारे ५० ते ६० हजारांच्या संख्येने वारकरी महाराजांच्या पालखी बरोबर प्रवास करीत असतात.
संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्यासाठी (दि.२६) ते (दि. २८) जून दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश गुरूवारी (दि.२०) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.
संगमनेर तालुका हद्दीतील गावांमधून संत निवृत्ती महाराज पालखी जात असते. (दि.२६) जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे श्री संत निवृत्ती महाराज पालखीचे आगमन व मुक्काम होणार आहे.
पालखी (दि.२७) जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदूर शिंगाटे ते लोणी जाणारे महामार्गावरुन तळेगाव दिघे मार्गे वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, कासारे, लोहारे पुढे लोणी, गोगलगाव येथे मुक्काम (दि.२८) जून रोजी सकाळी सहा वाजता पुन्हा नांदूर शिंगोटे लोणीच्या दिशेने जाणार आहे. तर नांदूर शिंगोटे ते लोणी हा रस्ता खुपच अरुंद आहे. या रस्त्यावरून सर्व जड वाहतूक चालु असते.
श्री संत निवृत्ती महाराज पालखी महत्त्वाची असून पालखीमध्ये सुमारे १ लाखाचे वर वारकारी सहभाग घेत असतात. पालखी रस्त्याने जात असताना वाहनांमुळे पालखीतील भाविकांना धक्का लागुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी संत निवृत्ती महाराज पालखी मार्गावरील जड वाहतुकीचे नियमन केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आदेश काढले आहेत. या आदेशानुसार संत निवृत्ती महाराज पालखी मार्गावरील जड वाहतुक (दि.२६) ते (दि. २८) जून रोजी दुपारी एक वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. लोणी-तळेगाव दिघे मार्गे नांदूर शिंगोटेकडे जाणारे जड वाहतुकीसाठी वाहतुकीसाठी मार्ग लोणी-वडगावपान-तळेगाव दिघे संगमनेर-नांदूर शिंगोटे, असा आहे.
नांदूर शिंगोटेकडुन लोणी तळेगाव दिघेकडे जाणारे जड वाहतुकीसाठी मार्ग नांदूर शिंगोटे-तळेगाव दिघे वडगावपान लोणी, लोणी-तळेगाव दिघेकडून कोपरगावकडे जाणारे जड वाहतुकीसाठी मार्ग लोणी-वडगावपान- तळेगाव दिघे-झगडेफाटा-कोपरगाव कडून लोणीकडे जाणारे जड वाहतुकीसाठी मार्ग कोपरगाव-झगडेफाटा तळेगाव दिघे वडगावपान लोणी, अहमदनगर असा आहे.
शासकीय वाहने, रुग्णावाहिका, फायर ब्रिगेड, पालखी सोहळ्यात सहभागी असलेली व परवानगी दिलेली वाहने व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना हा नियम लागू राहणार नाही.