Ahmednagar News : समाजात अशी अनेक माणसे असतात की जे आपल्या तत्वावर ठाम असतात. सामाजिक बांधिलकी जपण्यात किंवा नेहमीच समाजउपयोगी पडण्यात त्यांना धन्यता असते.
कितिही संकटे किंवा दुःख आले तरी ते तत्वावर ठाम असतात. असेच एक काळजात घर करणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून समोर आली आहे. एकुलता एक मुलाचा अपघात झाला व कुटुंबावर आघात झाला.
या अपघात मुलाचा ब्रेन डेड झाल्याने वडिलांनी आयुष्यभर विसरता येण्यासारखे डोंगराएवढे दुःख बाजूला सारत सामाजिक विचार करून त्याच्या किडनी, हृदय आणि फुप्फुसाचे दान केले. यामुळे चार जणांना नवीन जीवनदान मिळाले आहे. अपघातामुळे मेंदू निकामी (ब्रेन डेड) झालेल्या आपल्या पोटच्या मुलाचे अवयव दान करून रुईछत्रपती (पारनेर) येथील संजय व आशाबाई नाईक या दांम्पत्याने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
नाईक यांचा २० वर्षीय मुलगा महेश याचा नगर वाळकी रस्त्यावर अपघात झाला होता. डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या महेश याच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तेथून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महेशच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने तो वाचू शकणार नसल्याचे रुबी रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले. महेशचा ब्रेन डेड झाल्याने त्यातून तो सावरू शकणार नाही. त्याची जगण्याची शक्यता मावळल्याने डॉक्टरांनी सांगितल्यानंतर संजय व आशा नाईक यांना धक्का बसला.
एकुलता एक मुलगा अवघ्या विसाव्या वर्षी हे जग सोडून जाणार असल्याच्या कल्पनेने ते हादरून गेले. डॉक्टरांनी महेश याचे अवयव दान करण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर संजय व आशा यांनी या धक्क्यातून सावरत सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत महेशची दोन्ही मूत्रपिंड (किडनी), हृदय, तसेच फुफ्फुसाचे दान करण्यास सहमती दर्शवली.
महेशचे वडील संजय हे मुंबईत शिक्षक म्हणून काम पाहतात. सामाजिक कार्यात आघाडीवर असेलल्या संजय नाईक यांनी माझा मुलगा जग सोडून जात असताना त्याच्या अवक्यांमुळे कुणाला जीवदान मिळत असेल, तर ते दान करण्यास हरकत नसल्याची भूमिका मांडली व महेशचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.