Ahmednagar News : शहरातील एका माजी नगरसेवकाने मुन्सिपल कॉलनी येथे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी विनापरवानगी जास्तीचे वाढीव बांधकाम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे हे अतिक्रमण त्वरित पाडण्यात यावे व त्यांना अपात्र करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यान दिले.
याप्रसंगी अक्षय जाधव, मनोज जाधव, सागर पगारे, विशाल साठे, शरद कांबळे, प्रेम साठे, सागर भावले आदी उपस्थित होते. राहत्या घराचे मोजमाप करून घर बांधतानाची परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र पहाणी करावे, याचप्रमाणे प्रमाणपत्राप्रमाणे बांधकाम आहे किंवा नाही ते पाहून कारवाई करण्यात यावी. तसेच सर्जेपुरा लाल टाकी रोडवर जे वीर गोगादेव मंदिर आहे.
तेथे अतिक्रमण केलेले आहे. ती सर्व जागा शासनाची आहे त्यांनी समाजाची व नगरपालिकेची फसवणूक करून सर्व जागा आपल्या ताब्यामध्ये ठेवली असून या मंदिरामागे अनधिकृतपणे ऑफिस केलेले आहे व त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग झालेले आहेत.
त्यामुळे ऑफिस लवकरात लवकर पाडण्यात यावे व गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.