अहमदनगर बातम्या

आयएएस पूजा खेडकर यांच्या ‘दिव्यांग’ व नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्राचे अहमदनगरमध्ये कनेक्शन ? शोधाशोध सुरु

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर सध्या विविध आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांचा पाय अधिक खोलात जात असल्याची चर्चा आहे.

त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर आदी कागदपत्रे सगळेच संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे. दरम्यान आता हे दिव्यांग प्रमाणपत्रचे नगर सिव्हिलशी व नॉनक्रिमिलेअरचे नगर प्रांत शी कनेक्शन असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात.

कारण पूजा खेडकर नावाच्या दिव्यांग प्रमाणपत्राची समाज कल्याणकडे नोंद असल्याचे समोर आले असून ही नोंद आयएएस पूजा खेडकर यांचेच असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा रुग्णालय दिव्यांग प्रमाणपत्र देते. त्यानंतर या प्रमाणपत्राची समाजकल्याण विभागाच्या रजिस्टरला नोंदणी होते.

दरम्यान एका मीडियाला प्रतिक्रिया देताना डॉ. घोगरे यांनी असे म्हटले आहे की, आम्ही या प्रमाणपत्राचा शोध घेत आहोत. समाज कल्याण विभागाकडे नोंदणी असेल तर हे प्रमाणपत्र आम्हीच वितरित केलेले असेल.

ज्या प्रकारचे दिव्यांगत्व असेल त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर अगोदर रुग्णाची तपासणी करून दिव्यांगपण तपासतात. प्रमाणपत्रावर ते अगोदर स्वाक्षरी करतात.त्यानंतर या प्रमाणपत्रावर जिल्हा शल्यचिकित्सक स्वाक्षरी करतात.

ही तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक स्वतः करत नाहीत. दिव्यांगपण ठरवणे ही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचीच जबाबदारी आहे, असे डॉ. घोगरे यांचे म्हणणे आहे.

‘नॉन क्रेमिलिअर’ बाबत प्रांत घेतंय शोध
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आयएएस होते. दरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रात आपली संपत्ती ४० कोटींची आहे असे म्हटले होते. ही संपत्ती असताना देखील पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गात नॉन क्रेमिलिअरचे प्रमाणपत्र घेतले आहे का? अशीही शंका आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांनी आमच्याकडून हे प्रमाणपत्र घेतले आहे का याबाबत आम्ही तपासणी करत आहोत असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, पूजा यांनी नियमानुसारच दिव्यांग व क्रेमिलिअरचे प्रमाणपत्र घेतले आहे. त्याची तपासणी यूपीएससीने केली असल्याचे दिलीप खेडकर यांचे म्हणणे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office