अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : नगरमधील उड्डाणपुलाजवळ ‘लेडी डॉन मनी’ मनीषाचा मृतदेह, तिची हत्या की आत्महत्या?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर शहरामधून एक धक्कादायक बातमी आली आहे. एका १९ वर्षीय युवतीचा कल्याण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ मृतदेह आढळून आला. रविवारी (दि.२६) पहाटे ही घटना समोर आली. मनिषा सुभाष बेलापुरकर (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) असे मयत युवतीचे नाव आहे.

नालेगाव भागात लेडी डॉन मनी नावाने परिचित असलेल्या मनिषाचा मृतदेह पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. दरम्यान जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी तिला मृत घोषित केले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

तोफखाना पोलिसांनी या घटनेसंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्याचे जिल्हा रूग्णालयात नियुक्त असलेले सहाय्यक फौजदार जठार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मनीषा हिच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर काहींनी घातपाताची शक्यताही व्यक्त केली. मात्र, शवविच्छेदनानंतर ही शक्यता पोलिसांनी फेटाळली आहे. मयत मनीषाच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्यानंतर घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. तपास पोलीस अंमलदार भास्कर गायकवाड करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अनॆक ठिकाणी मृतदेह आढळून आल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. नुकतेच कोपरगावमध्ये तीन मृतदेह आढळून आले होते. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतरही भागात अशा घटना समोर आलेल्या आहेत. दरम्यान नगरमधील मनीषा हिच्या मृत्यूनंतर नागरिक विविध शंका व्यक्त करत आहेत. घातपाताची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. परंतु या शक्यता पोलिसांनी फेटाळून लावल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office