Ahmednagar News : अनेकदा आपण पाहतो की, अनेक लोक आपल्या फायद्यासाठी किंवा एखाद्या कामासाठी रस्ता खोदतात. यातील बरेचशे लोक हा रस्ता दुरुस्तही करत नाहीत. त्यामुळे बहुतांशवेळी या रस्ता खोदण्याचे प्रवाशांना खूप त्रासही होतो.
तसेच शासनाने या रस्त्यावर जो खर्च केलेला असतो तर तो वाया जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का, विना परवाना रस्ता खोदला तर संबंधितावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे, तसेच रस्त्याचे जास्तच नुकसान झाले असेल तर गुन्हाही दाखल केला जातो.
पाण्याची लाइन, गॅस लाइन, विविध कंपन्यांचे केबल, गटारी टाकणे आदी कामांसाठी रस्ते खोदले जातात. शासकीय यंत्रणेकडून रस्ते खोदले तर ते दुरुस्त करण्याची तरतूद ठेवलेली असते.
मात्र, खासगी कामासाठी रस्ता खोदला तर तो दुरुस्त केला जात नाही. त्यामुळे जो निधी खर्च करून रस्ते, सुखसुविधा बनवलेल्या असतात त्या नष्ट होतात व नागरिकांची हेळसांड होते.
दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा
विनापरवाना रस्ता खोदला महापालिकेकडून दंडात्मक कारवाई अथवा गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे विनापरवाना रस्ता खोदने चांगलेच महागात पडू शकते.
रस्ता खोदण्यासाठी परवानगी आवश्यक
शहरात रस्ता खोदायचा असेल तर महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. रस्ता किती खोद्यायचा आहे त्याचे मोजमाप करून त्या प्रमाणात शुल्क आकारले जाते अथवा खोदलेला रस्ता दुरुस्त करून द्यावा लागतो.
विनापरवाना रस्ता खोदला तर संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाते, त्याच्याकडून रस्ता दुरुस्त करून घेतला जातो किंवा संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे शहरात विनापरवाना कुणीही रस्ता खोदू नये.