संपदा पतसंस्थेचा संचालक भाऊसाहेब कुशाबा झावरे (रा. वासुंदे, ता. पारनेर) याचा कारागृहात मृत्यू झाला आहे. कर्ज घोटाळ्याबद्दल त्यास शिक्षा ठोठावण्यात आली होती. संपदा पतसंस्थेच्या १३ कोटींच्या कर्ज घोटाळ्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने ज्ञानदेव वाफारेसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
तर अन्य बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये भाऊसाहेब झावरे यांचा समावेश होता. नाशिक येथील कारागृहात शिक्षा भोगत होते. झावरे यांना दुपारच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले, त्यांना तातडीने हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आले. परंतू, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मध्यवर्ती कारागृहात कैदी म्हणून असलेले झावरे हे संपदा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी नऊ वर्षांची शिक्षा लागल्याने दीड महिन्यांपूर्वी दाखल झाले होते. त्यांना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक खूप घाम फुटल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झावरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करत असताना त्यांचे निधन झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. झावरे यांचा मृतदेह धुळे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
‘संपदा’च्या घोटाळाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यासह १७ जणांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह तीन संचालकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे या पाच आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.