अहमदनगर बातम्या

अहमदनगरमधील ‘हे’ गाव माहित आहे का? येथे कोसळला ४ हजार मिमी पाऊस

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सध्या झालाय. अनेक धरणेही पूर्ण क्षमतेने भरलीयेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की अहमदनगरमधील असं एक गाव आहे की जेथे या मोसमात तब्बल साडेचार हजार मिमी पाऊस कोसळलाय.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर याठिकाणी या मोसमात आजपर्यंत सुमारे पावणे पाच हजार मिलिमीटर पाऊस झालाय. तसेच या क्षेत्रातील रतनवाडीत सव्वा चार हजारहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झालीये.

पावसाचे आगार म्हणून समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे पावसाची सरासरी साडे पाच हजार मिलिमीटर इतकी तर याच पाणलोटातील रतनवाडी, पांजरे, साम्रद, भंडारदरा, शिंगणवाडी, उडदावणे या परिसरात तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडत असतो.

६ जुलै ते २९ ऑगस्ट या महिनाभरात रतनवाडीला ४ हजार ३६१ मिलिमीटर पाऊस कोसळला. ४ ऑगस्ट रोजी येथे विक्रमी म्हणजेच ४४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

या खालोखाल पांजरे येथे ३ हजार ७७० तर भंडारदरा धरणस्थळी २ हजार ६७५ मिलिमीटर पावसाची नोंद या मोसमात आजपर्यंत झाली.

राज्यात पाणीसाठा मुबलक
यंदा राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झालाय. राज्यात जुलैपासून मुसळधार तसेच काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या जवळजवळ सर्वच नद्यांना पूर आले.

त्यामुळे जलसंपदा विभागाच्या राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या या धरणांमध्ये ७६.७४ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवसांत ६७.७८ टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office