Ahmednagar News : खा. लंके मारणेच्या भेटीस का गेले? आता रोहित पवारांनी खरं सांगून टाकलं, म्हणाले, निलेश भाऊंना…

Pragati
Published:
pawar

Ahmednagar News : खा. निलेश लंके हे आज कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीने चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणावरून टीका होताहेत. दरम्यान त्यांनी याबाबत बोलताना ही भेट अपघाताने झाली, मला ते कोण आहेत हे माहिती नव्हते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दरम्यान आता यामध्ये आ. रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यानंतर त्यांनी आमदार रोहित पवारांनी माफी देखील मागितली आहे. काय म्हणाले आ. रोहित पवार हे आपण जाणून घेऊयात.

रोहित पवार म्हणाले…
लंके-मारणे भेटीवर बोलताना ते म्हणाले की, आहिल्यानगरचा आमदार म्हणून व निलेश भाऊंच्या प्रचारात सक्रिय असणारा कार्यकर्ता म्हणून बोलत असून जे घडले ते योग्य झाले नाही. निलेश भाऊंनी याबाबत माफी देखील मागितली आहे.

त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कोणत्याही नेत्यास कोणाच्याही घरी नेताना थोडा विचार केला पाहिजे. त्याचे कारण म्हणजे जनता नेत्यास फॉलो करत असते.

ज्या प्रमाणे निलेश भाऊंनी माफी मागितली आहे त्याचपद्धतीने मी देखील माफी मागतो. आमच्यातील एक खासदार नकळत चुकीच्या प्रवृत्तीच्या घरी गेलाय तेव्हा आता कृपा करुन याच्यावर कोणही राजकारण करु नये अशी विनंती देखील आ. रोहित पवार यांनी केली आहे.

खा.लंके काय म्हणाले होते?
खा.निलेश लंके म्हणाले आहेत की, ती सन्माननीय व्यक्ती कोण आहे याची मला कल्पना नव्हती. आपण समाजकार्यात काम करणारी माणसं. कोणीही गाडीला हात केला की थांबतो. काल त्यांच्या घरासमोरून जात असताना त्यांनी हात केला. मी थांबलो.

त्यांनी चहा प्यायला चला म्हणून सांगितले. आम्ही चहा घेतला. त्यांनी माझा सत्कारही केला. तोपर्यंत मला समोरील सन्माननीय व्यक्ती कोण, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे माहिती नव्हते. आज सकाळी मला कळाले की काल ज्यांना आपण भेटलो ते अशा अशा प्रवृत्तीची व्यक्ती होती.

मला आधी माहिती असते तर मी तेथे गेलो नसतो. ही घटना अपघाताने घडली. तरीही ती चूकच म्हणावी लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe