अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी एकनिष्ठ कार्यकत्र्याची निवड पक्षाने केली आहे.असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन व ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले.
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी भैय्या गंधे यांची निवड झाल्याबद्दल पंडीत दीनदयाळ परीवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विकास पाथरकर,गौतम दिक्षित,ॲड.अभय आगरकर,सदाशिव देवगांवकर,ॲड.अच्युत पिंगळे,ढोकरीकर,सचिन पारखी,सुरेखा विद्ये,गोकुळ काळे,निलेश लाटे,सुखदेव दरेकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना वसंत लोढा म्हणाले की, सर्वांना जवळचे असलेले अध्यक्ष जिल्हा भारतीय जनता पार्टीला मिळाले आहेत.
शहराध्यक्ष, दक्षिण जिल्हाध्यक्ष व उत्तर जिल्हांध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड पक्षाच्या श्रेष्ठींनी केली आहे. तोलामोलाचे व एकनिष्ठ समाजीक जाण असलेल्या कार्यकत्यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.याचा सर्वात जास्त आनंद झाला आहे. शहर जिल्हाध्यक्ष आपल्यातील एखादा कार्यकर्ता व्हावा, यासाठी गेल्या १५ दिवसांपासून मी प्रयत्न करत होतो. त्यास यश आले आहे.
पक्षाने भैय्या गंधे यांच्या चांगल्या कामाची दखल घेत शहराचे अध्यक्षपद दिले आहे. ते संधीचे सोने करतील.असे लोढा यावेळी म्हणाले.