Ahmednagar News : मार्च संपला तरी वसुली नाही ! घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीवर निवडणुकीचा परिणाम, जिल्ह्यात ८५ टक्केच वसुली

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : प्रशासनाचा उत्पनाचा मुख्य स्रोत असतो तो म्हणजे जमा होणार कर. गावपातळीवर पाणी व घरपट्टी यामाध्यमातून कर जमा होत असतो. शक्यतो मार्च अखेर वसुलीचे टार्गेट असते. मार्च अखेर वसुली होत असते.

परंतु यंदा निवडणूक लागल्या आहेत. व याचा परिणाम करवसुलीवर होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग मागील दोन महिन्यांपासून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्नशील आहे. प्रशासनाने ग्रामसेवकांना वसुलीसाठी महिनाभराची मुदत दिली.

तरीही वसुली ८५ टक्केच्या पुढे गेलेली नाही. मागील वर्षीपेक्षा ती दोन टक्के कमीच आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून पाणीपट्टी-घरपट्टी भरण्यास चालढकल होत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारीही कोणाला दुखावण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

त्यामुळे करवसुलीवर परिणाम झाला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सर्व ग्रामपंचायतींना मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. मागील थकबाकीसह यंदा ४९ कोटी ७ लाख पाणीपट्टी, तर २४ कोटी ८५ लाख पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते.

दरवर्षी मार्चअखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न केले जातात. ग्रामसेवकांकडून यासाठी मोहीम स्तरावर काम केले जाते. जिल्ह्यात १,३२० ग्रामपंचायती आहेत. दरवर्षी ९० टक्क्यांच्या आसपास वसुली होते, असे आकडेवारीवरून दिसते.

यंदा मात्र लोकसभेच्या निवडणुका आल्याने काही ठिकाणी वसुलीला ब्रेक लागला आहे. ग्रामसेवकांनी वसुलीचे नियोजन केले. मात्र निवडणुका असल्याने नागरिकांनी दुर्लक्ष केले.

ग्रामपंचायतींकडील थकबाकीची काही प्रकरणे
तडजोडीसाठी लोकअदालतीत ठेवण्यात आली. त्यातून ३ कोटींची वसुली झाली. ग्रामसेवकांनी प्रयत्न करून उद्दिष्ट ८४ टक्केपर्यंत पोहोचले. परंतु तरीही निवडणुकीचा परिणाम वसुलीवर झालेला दिसत आहे.

२०२४ ची कर वसुली
कर                  एकूण मागणी                एकूण वसुली
घरपट्टी               ४९ कोटी ७ लाख            ४१ कोटी ५९ लाख (८४.७६ टक्के)
पाणीपट्टी            २४ कोटी ८५ लाख           २१ कोटी ३३ लाख (८५.८२ टक्के)
व्यापारी गाळे       ४ कोटी १३ लाख             ३ कोटी ४० लाख (८२.३४ टक्के)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe