Ahmednagar News : साईबाबांना मानणारा भक्तवर्ग संपूर्ण देशभरात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तगण येथे दर्शनाला येतात. परंतु येथील कर्मचाऱ्यांसह अनेकांना गंडा घालण्याचे काम काही सायबर क्राईम करणाऱ्या भामट्यांनी केले आहे.
साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) राहिलेल्या आयएएस अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या नावाने हे पैसे उकळले आहेत. त्यांच्या नावाचे एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले. त्यानंतर त्या अकाऊंटवरुन एक विशिष्ट मेसेज अनेकांना मिळाला होता.
लोकांनी त्याची खात्री न करताच पैसे संबंधित दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर केले. मात्र ते फेसबुक अकाऊंट बनावट असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याबाबत बानायत यांनी सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली आहे.
काय पाठवले होते मेसेज? कस फसवलं गेलं ?
भाग्यश्री बानायत यांच्या नावाने जे फेक अकाऊंट उघडलं गेलं होत त्यावरून जे मेसेज आले होते त्यात म्हटलं होत की, संदीप कुमार नावाचा सीआरपीएफ अधिकारी असणारा माझा एक मित्र आहे. सीआरपीएफ कॅम्पमधून तो तुम्हाला फोन करेल. नुकतीच त्याची ट्रान्स्फर झाली आहे.
त्यामुळे तो त्याच्या घरातील फर्निचरच्या वस्तू विकत आहे. त्या असणाऱ्या वस्तू चांगल्या व अतिशय कमी किमतीत भेटत आहेत. पैशांबाबत काही अडचण आल्यास मी जबाबदार असेल असेल या मॅसेज मध्ये म्हटले होते.
त्यामुळे अनेकांनी खात्री न करताच पैसे पाठवून दिले. परंतु हे सर्व फेक असल्याचे समजताच पैसे देणाऱ्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. यातून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
भाग्यश्री बानायत यांची तक्रार व आवाहन
वर्षभर शिर्डीच्या साईबाबा संस्थानमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर आयएएस भाग्यश्री बानायत यांनी काम केले आहे. या प्रकरणाबाबत त्या म्हणाल्या, हे अकाऊंट माझे नसून कुणीही कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशा प्रकारचे मेसेज येत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी स्वतःही याबाबत सायबर सेलला तक्रार दिली आहे.