शेतकरी है त्यो ! बिबट्याने घरातल्या कुत्र्याला उचलले, शेतकरी थेट बिबट्यालाच भिडला, अहमदनगरमधील थरार

सध्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत, हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी नेहमीच दहशतीखाली असतात. परंतु शेतकरी जर इरेला पेटला किंवा जवळच्या व्यक्तीला काही इजा झाली तर तो जीवाची पर्वा न करता बिबट्यालाही पळवून लावू शकतो.

Pragati
Published:
bibatya

Ahmednagar News : सध्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत, हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी नेहमीच दहशतीखाली असतात. परंतु शेतकरी जर इरेला पेटला किंवा जवळच्या व्यक्तीला काही इजा झाली तर तो जीवाची पर्वा न करता बिबट्यालाही पळवून लावू शकतो.

असेच काहीसे घडले आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात. अर्जुन वेताळ असे या शेतकऱ्याचे नाव असून ते कोपरगाव तालुक्यातील काकडी मल्हारवाडी – वेताळ वस्ती येथे राहतात. त्यांनी आपल्या पाळीव कुत्र्यास मोठ्या हिमतीने बिबट्याच्या हल्ल्यातून सोडवले.

त्याचे झाले असे, वेताळ यांच्या घरासमोरील अंगणात बसलेल्या कुत्र्यावर रात्री १ च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. तेव्हा ते घराच्या पडवीत झोपलेले होते. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत मानेला पकडले. कुत्र्याने आरडाओरडा केल्याने वेताळ यांना जाग आली.

त्यांना समोरून कुत्र्याला बिबट्या ओढत नेत असताना दिसला. त्यांनी हातात काठी व बॅटरी घेत असताना बिबट्याने कुत्र्याला बाजूच्या डाळिंब बागेत फरपटत नेले होते.

वेताळ यांनी बागेत जाऊन दूरवरून बॅटरीचा उजेड बिबट्यावर करत आरडाओरड केल्याने कुत्र्याला सोडून बिबट्या पसार झाला. त्यांनी अगदी बिबट्यालाही भिडण्याची तयारी दाखवल्याने बिबट्यानेही धूम ठोकली. वेताळ वस्ती, भांबारे मळा, रानडे मळा, थोरात मळा या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे.

शेतात काम करतानाही अनेकवेळा शेतकरी वर्गाला दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. या परिसरात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्य वतीने करण्यात येत आहे.

राहुरीत तीन बिबट्यांचा मुक्त संचार
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल तीन बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, लगतच्या गावांमध्ये मानवावर बिबट्यांचे जीवघेणा हल्ला होत असताना बारागाव नांदूरसह डिग्रस, म. फुले कृषी विद्यापीठ हद्दीमध्ये बिबट्याचे होणारे दर्शन ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा समजली जाते, मात्र या गंभीर प्रश्नाकडे वन विभागाचा कानाडोळा होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe