अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू मुलगा जखमी, कार शेडवर आदळली तर दुचाकीचा चक्काचूर

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : वडील व मुलगा महामार्ग ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बापाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १४ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

या भीषण अपघातात रघुनाथ बबन जाधव (वय ३५, रा. चासनळवाडी ता. सिन्नर जि. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा श्रीकांत रघुनाथ जाधव (वय १४) हा गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी मुलाला रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जाधव हे मूळचे सिन्नर तालुक्यातील चास येथील रहिवाशी आहेत. त्यांचा 14 वर्षीय मुलगा ऋत्विक रघुनाथ जाधव हा इयत्ता चौथीमध्ये जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे शाळेत शिकत होता. तो गंभीर जखमी झाला आहे.

स्थानिकांच्या मदतीने त्याला उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यात चारचाकीचे मोठे नुकसान झाले असून त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला असल्याचे वाहनचालकाने सांगितले. महामार्गावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

अपघातानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्ग सोडून एका शेडवर जाऊन आदळली आहे. तर दुचाकीचा चक्काचुर झाला आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांचा पोलिस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. घारगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. अहमदनगरमधील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यातील मृतांची संख्याही चिंताजनक आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office