Ahmednagar News : माळीवाडा परिसरात भीषण आग, नागरिकांची पळापळ

Ahmednagarlive24 office
Published:
AGNISHAMAN

Ahmednagar News : अहमदनगर शहरात अलीकडील काही दिवसात आग लागण्याचे अनेक प्रकार समोर आले. बस स्टॅन्ड शेजारील अंबर प्लाझा बिल्डिंगमध्ये आग लागण्याची घटना नुकतीच घडली होती.

आता माळीवाडा परिसरात भोपळे गल्लीत आग लागण्याची घटना घडली आहे. येथे एका घराला आग लागली. त्यामुळे काही काळ नागरिकांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले.

अधिक माहिती अशी : माळीवाडा परिसरात भोपळेगल्लीत एका घराला आग लागली. ही आग तुषार डागवाले यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती समजली आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि.१२) दुपारी घडली.

घटनेची माहिती समजताच उद्धव ठाकरे गटाचे समन्वयक दत्ता जाधव यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली.

यावेळी दीपक पवार, आदेश जाधव, विशाल भुतारे, संतोष मेहेत्रे आदींसह नागरिकांनी बचाव कार्यात सहभाग घेतला. अग्निशमन विभागाचे मिसाळ यांनी आग विझवण्यास मोठे परिश्रम घेतले. ही आग ताबडतोब आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शहरात आगीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. नुकतेच सावेडी, अम्बर प्लाझा बिल्डिंग आदी आगीच्या घटना ताजा आहेत. शॉर्टसर्किट, वाढती उष्णता, हलगर्जीपणा आदी गोष्टी या आगीस कारणीभूत असल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe