अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात सात तास आगीचे तांडव ! ४०० लोक आग विझवायला.. मोठा थरार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून भीषण आगीबाबत एक वृत्त आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात काल (दि.२६) मध्यरात्री भीषण आगीची घटना घडली.

यात जवळपास १२ दुकाने जाळून खाक झाल्याची माहिती समजली आहे. ही आग विझवण्यासाठी जवळपास ७ तास लागले असल्याची माहिती समजली आहे.

अधिक माहिती अशी : नेवासेमधील नगर पंचायत चौकात मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास भीषण आग लागली. पंचायतसमितीकडे अग्निशमन बंब नसल्याने ज्ञानेश्वर कारखाना व मुळा कारखान्याचे अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले होते.

ते बंब येईपर्यंत आग चांगलीच भडकली. हे बंब येईपर्यंत जवळपास एक तास गेला. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास ७ तास लागले.

नागरिकांनी देखील ही आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. दरम्यान ही आग का लागली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. रात्री आग लागल्याचे कळताच आम्ही सदर ठिकाणी धाव घेतली.

जवळपास १० ते १२ दुकानांना आग लागली होती. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न ही आग विझविण्याचा केला. ४०० ते ५०० लोकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतु तरीही यात सर्व जळून खाक झाले.

दीड ते दोन कोटींचे नुकसान झाले. तरी शासनाने आम्हाला मदत करावी अशी विनंती नुकसानग्रस्तांनी केली आहे. नगरपंचायतीने कोणतीही मदत केली नाही. सकाळी ११ वाजता देखील कोणते अधिकारी आले नव्हते. येथे साधे अग्निशमन बंब देखील नाही.

अग्निशमन बंब नसल्याने ज्ञानेश्वर कारखाना व मुळा कारखान्याचे अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले होते. नगरपंचायतीकडे यंत्रणा नसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तरी शासनाने सर्वतोपरी मदत या व्यापाऱ्यांना करावी अशी मागणी नागरिक करत होते.

Ahmednagarlive24 Office