Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथे केदार वस्तीवर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक वादातून एकावर गोळी झाडण्यात आली. गोळीबारत माणिक सुखदेव केदार ही जखमी झाले आहेत. त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्राकडून समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील सुभाष विष्णू बडे याचे लग्न झाले होते. आठ वर्षानंतर पती-पत्नीमध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर घटस्फोटीत महिलेने हाताला येथील युवकाशी विवाह केला होता. त्याच रागातून सुभाष बडे यांनी गुरुवारी सायंकाळी अंतराळ येथील केदार वस्तीवर जाऊन कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला.
पिस्टल मधून झाडलेल्या गोळीतून माणिक केदार यांच्या छातीच्या खालच्या भागांमध्ये गोळी लागली असून त्यांना पाथर्डी चे उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगर येथे हलवण्यात आले आहे. हातराळ येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुभाष बडे याला जमावाने मारहाण केली आहे.
त्याच्या डोक्यामध्ये मार लागला आहे. घटनेची माहिती समजतात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक सचिन लिमकर हे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. तेथे सुभाष बडे याला ग्रामस्थांनी बांधून ठेवलेले होते. त्याला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून एक पिस्टल आणि कोयता पोलिसांनी जप्त केला आहे.
माणिक केदार यांना नगरला हलवल्यानंतर सुभाष बडे याला देखील उपचार करून नगर येथे हलविले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्ह्याची नोंद झालेली नाही. कौटुंबिक वादातून झालेला हा हल्ला भयानक होता. घटना स्थळावरून पिस्टल व कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हल्ल्याचे कारण फिर्याद दाखल झाल्यानंतरच उघडणार आहे.