Ahmednagar News : यंदा संपूर्ण राज्यभरात दुष्काळी परिस्थीती असल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे पाण्यावाचून उभी पिके करपून गेली आहेत. सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. लग्नसमारंभात सजावटीसाठी फुलांना मोठी मागणी असते. सभागृहांमध्ये, घरात फुलांची सजावट करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे फुलांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. फुलांची मागणी वाढल्याचा परिणाम दरावरही झाला आहे. फुलांचे दर दहा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सजावटीसाठी फुले खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर थोडासा ताण पडणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर अनेकांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. ती म्हणजे प्लास्टिकची फुले. सध्या अनेक कार्यक्रमात नैसर्गिक फुले न वापरता सर्रास प्लास्टिकची फुलेही वापरली जात आहेत. नैसर्गिक फुलांच्या तुलनेत प्लास्टिकची फुले स्वस्त देखील असतात व त्यांचा दीर्घकाळ वापर करता येतो. त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अशी फुले उपलब्ध आहेत .
चालू वर्षी चांगला पाऊस पडला नसल्याने सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्याअभावी शेती उजाड झाली आहे. अशातच जीवापाड जपलेल्या फळबागा देखील सुकून गेल्या आहेत. तर दुसरीकडे फुलशेती देखील यातुन सुटली नाही. एकीकडे तीव्र उन्हामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. तर दुसरीकडे
लग्नसमारंभाच्या कालावधीत फुलांची आवक कमी व मागणी वाढल्याने हारांसह फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईत फुलांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. लग्न समारंभ व घरांच्या वास्तुशांती व इतर धार्मिक कार्यक्रमांच्या धामधुमीमुळे तसेच वाढत्या तापमानामुळे विविध प्रकारच्या फुलांच्या किमती तिप्पटीने वाढल्या असून, मोगरा व गुलाबाचा सुगंध तर अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा चांगलीच बाजी मारली आहे.
या सर्व फुलांचा दर लग्नसराई संपेपर्यंत चढेच राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. शुभकार्यासाठी विविध प्रकारच्या फुलांची गरज असते. लग्नमुहुर्तामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली होती. जादा फुलांचीकरावी लागत आहे. नाहीतर जादा दराने फुले विकत घेण्याची वेळ येत आहे. त्यामध्ये वाढत्या तापमानाची अधिक भर पडली आहे. उन्हाच्या झळांमुळे नाजुक फुले कोमेजून जात आहेत.
पाण्याच्या तुटवड्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी होऊ लागली आहे. मोगऱ्याच्या फुलांचा दर सध्या तिप्पटीने वाढला आहे. पूर्वी २५० रुपये किलो असलेला दर सध्या ७०० ते ८०० रुपये झाला आहे. त्यामुळे मोगऱ्याचा सुगंध महागला आहे. पूर्वी लग्नामध्ये फुलांना पर्याय नसायचा; परंतु सध्या वेगवेगळे इव्हेंट आले आहेत. त्यातच केवळ फुलच नव्हे तर इतर वस्तूचे भाव देखील वाढले आहेत. त्यामुळे वाढत असलेला खर्च कमी करण्यासाठी अनेक कार्यक्रमात
नैसर्गिक फुले न वापरता सर्रास प्लास्टिकची फुलेही वापरली जात आहेत. नैसर्गिक फुलांच्या तुलनेत प्लास्टिकची फुले स्वस्त देखील असतात व त्यांचा दीर्घकाळ वापर करता येतो, त्याचाही परिणाम फुले विक्रीवर होत असल्याचे दिसून येत आहे.