अहमदनगर बातम्या

मौजमजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडसाठी.. ‘तो’ अपहरण करायचा त्यानंतर.. अहमदनगरमधील ‘तो’ लुटारू जेरबंद

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नशा करून मौजमजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवाशाचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या एकाला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले.

बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे (वय २३ रा. काटवण खंडोबा, महात्मा फुले वसाहत) असे जेरबंद केलेल्या लुटारूचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अनिल गोरख हाडे (रा. मैदा, जि. बीड) रविवारी रात्री पुण्याहून नगरला आला.

बीडकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत तो नगर येथील पुणे बसस्थानकात थांबला होता. त्यावेळी तिथे वरील दोघे आरोपी आले. त्यांनी हाडे यांना दमदाटी करत दुचाकीवर बसवीत शहरापासून दूर लष्कर परिसरात नेले.

तिथे त्यांच्या खिशातील रोख ९०० रुपये तसेच एमटीएमचा पासवर्ड माहिती करून घेतला. नंतर त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ४४ हजार रुपये काढून घेतले. त्यांनी तत्काळ कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिसांनी शोध सुरू केला.

तांत्रिक विश्लेषणात वरील दोघा आरोपींची नावे समोर आली. यातील एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्याने त्याचा साथीदार केदारे याने फिर्यादीच्या खात्यातून पैसे काढले व त्यातून प्रेयसीसाठी ४५ हजारांचे घड्याळ खरेदी केले असून, हे घड्याळ घेऊन तो मुंबईला गेला आहे, असे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

नशा, मौजमजेसाठी करत होते लुटमार
रात्रीच्यावेळी एकटे पाहून अपहरण करायचे, अपहरण करून दूर नेऊन लुटायचे. यातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी मौजमजा करत असल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीने दिली.

Ahmednagarlive24 Office