अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अमृत संजीवनी संस्थेचे माजी संचालक विकास शिंदे यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश,करंजीत पुन्हा कोल्हे गटाला बसला मोठा धक्का..

Published by
Ahmednagarlive24 Office

आ.काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी ऐतिहासिक कामगिरी करताना ३ हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणला आहे.मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असून अनेक वर्षापासून तर काही दशकापासून प्रलंबित असलेली कामे आ.काळे यांनी या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करून दाखविली आहे.

त्यामुळे आ.काळे यांच्या रूपाने एक कर्तबगार लोकप्रतिनिधी मतदारसंघाला लाभला आहे.आ.काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी ऐतिहासिक कामगिरी करताना ३ हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणला आहे.

करंजी येथील अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे माजी संचालक विकास शिंदे यांनी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत आपले सहकारी संदिप शिंदे, केशव शिंदे, विकास शिंदे आदींच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.दोनच दिवसात कोल्हे गटाला बसलेला हा दुसरा धक्का आहे.

कोपरगावातील सर्व नागरिकांच्या समस्या आ. काळेच सोडवू शकतात, याची प्रत्येक नागरिकाला खात्री पटली आहे. यामध्ये कोल्हे गटाचे कार्यकर्ते देखील मागे नाहीत.करंजी गावात कोल्हेंची ४० वर्षे सत्ता असताना जेवढा निधी आला नाही तेवढा निधी आ. काळेंनी या पाच वर्षात एकूण ४२ कोटीचा निधी दिला आहे.

मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असून अनेक वर्षापासून तर काही दशकापासून प्रलंबित असलेली कामे आ.काळे यांनी या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करून दाखविली आहे.त्यामुळे आ. काळे यांच्या रूपाने एक कर्तबगार लोकप्रतिनिधी मतदारसंघाला लाभला आहे.

गावाबरोबरच मतदारसंघाचादेखील जास्तीत जास्त विकास व्हावा या उद्देशातून कामाच्या आमदाराच्या मागे ताकद उभी करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी संचालक विकास शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारभारी आगवण, एकनाथ लांडबिले, गोपाल कुलकर्णी,गौतम बँकेचे संचालक संजय आगवण, भास्करराव शहाणे, नारायण भारती, चांगदेव कापसे, विजय गायकवाड,सांडू पठाण, उत्तम गायकवाड या मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Ahmednagarlive24 Office