Ahmednagar News : शासन सध्या विविध धडाकेबाज निर्णय घेत आहे. विविध योजना शासनाकडून राबवण्यात येत आहेत. या योजनेचाच एक भाग म्हणजे कृषिपंपांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय. शेतकऱ्यांना याचा फार मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानुसार साडेसात एचपीपर्यंतच्या कृषिपंपांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या योजनेत व शासन निर्णयानुसार जिल्ह्यात एकूण ३ लाख ७८ हजार ग्राहक साडेसात एचपीपर्यंतचे आहेत.
याचाच अर्थ अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ७८ हजार ग्राहकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.राज्यामधील ७.५ एचपी (अश्वशक्ती) पर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राहील. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यात नगर जिल्ह्यातील ३ लाख ७८ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.
या वीज बिल माफीसाठी येणारा खर्च राज्य सरकार महावितरणला देणार आहे. राज्यात मार्च २०२४ अखेर ४७.४१ लाख कृषीपंप ग्राहक शेतकरी आहेत. एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण १६ टक्के आहे. ३० टक्के वीज कृषिपंपांसाठी वापरली जाते.
विभागनिहाय कृषी ग्राहक संख्या
विभाग ७.५ एचपीपर्यंतचे ग्राहक ७.५ एचपीपुढील ग्राहक
संगमनेर ८८७९७ ८९८०
श्रीरामपूर ६५२८४ २११८
एकूण ३७८३०५ २२५३८