Ahmednagar News : निघोज, शिरापूर देवीभोयरे तसेच टाकळी हाजी, शिरुर परिसरात ड्रोन सदृष उपकरणे आकाशात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत गेली चार दिवसांपासून घिरट्या घालत असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाधिकारी व संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन जनतेला या बाबत प्रबोधन करुन भिती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
रात्री दहा नंतर चार ते पाच ड्रोन सदृष उपकरणे पाहिले असल्याची माहिती शिरापूर येथील अंकुश वडने यांनी सांगितले. तसेच टाकळी हाजी येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषाताई बारहाते यांनी याबाबतमाहिती देताना सांगितले की बुधवार दि. २६ रोजी रात्री दहा वाजता ड्रोन सदृष उपकरणे आकाशात घिरट्या घालताना दिसले.
हे उपकरणे निघोज तसेच शेजारील गावातून येत असून यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत बारहाते यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
याबाबत लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ काळजी घेऊन जनतेच्या मनातील भिती नाहीशी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जनतेतून करण्यात आले आहे.
श्रीगोंदेमध्येही प्रकार
तालुक्याच्या पश्चिम भागातील येळपणे, येवती, ढवळगाव, देवदैठण, गव्हाणेवाडी, मोटेवाडी, पारनेर तालुक्यातील यादववाडी परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याने भीतीचे वातावरण झाले आहे. रात्री नऊ नंतर ड्रोन गावांमधून फिरत असून,
घराच्या काही अंतरावर घिरट्या घेत असल्याने ग्रामस्थांसह नागरिक चिंतेत आहेत. हे ड्रोन काही सर्वे करतात की चोरटे ड्रोनद्वारे टेहाळणी करून चोरी करीत आहेत हे समजायला तयार नाही. सध्या या ड्रोनची चर्चा गावांमध्ये व सोशल मीडियावर रंगली आहे.
कर्जतमध्येही हाच प्रकार
कर्जत तालुक्यातही असलाच प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.