अहमदनगर बातम्या

खुशखबर ! भंडारदरा धरण तब्बल ‘इतके’ टक्के भरले, पाणलोटात संततधार सुरूच

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊसधारा या आठवड्यातही महामुंबईसह महाराष्ट्रात कायम राहणार आहेत. कधी कमी, तर कधी जास्त असे असले तरी मान्सूनचा वेग कमी होणार नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. जून महिन्यात मान्सून दोन दिवस आधीच दाखल झाला असला, तरी पावसाने पुन्हा दडी मारली होती.

परंतु मागील आठवड्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे या दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढू लागली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातील पाणीसाठा चाळीस टक्के झाला होता.

मागील तीन दिवसांपासून मुळा- भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे सातत्य टिकून आहे. यामुळे या परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे या दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढत आहे.

रविवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात २९५ तर सायंकाळी सहा वाजता संपलेल्या बारा तासांत २१४ असे एकूण ३६ तासांत अर्धा टीएमसीहून अधिक म्हणजेच ५०९ दलघफ नवीन पाण्याची आवक होत ११ हजार ३९ दलघफू क्षमता असलेल्या धरणातील पाणीसाठा ४ हजार ३८९ दलघफूटापर्यंत पोहचला होता.

तर निळवंडे धरणातील पाणीसाठा १ हजार ४३८ दलघफू इतका झाला होता. दरम्यान, रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भंडारदरा २७, घाटघर ८९.००, पांजरे ७७, रतनवाडी ८२, निळवंडे १६ असा पाऊस झाला आहे.

महामुंबईत ऑरेंज अलर्ट


हवामान खात्याने मंगळवारी मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचसोबत रायगडसाठी सोमवार आणि मंगळवारीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Ahmednagarlive24 Office