Ahmednagar News : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य अधिकारी विनायक दीक्षित व जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, किरण मोरे, दत्तात्रय जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या खरीप हंगामामधील सर्व पिकांना व रब्बी हंगामामधील पीकविमा नुकसानभरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे.
स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना महिला आघाडीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सुनीता वानखेडे, वर्षा वानखेडे, बाळासाहेब घोगरे, हौशिराम दांगट,
विश्वास तनपुरे, संजय विटे, अभिजित यादव, योगेश महांकाळे, मधू काकड, प्रकाश जाधव, भानुदास चोरमल, रवी वानखेडे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. २० जुलैपर्यंत नगर जिल्ह्यातील सर्व पात्र विमा पॉलिसीधारक शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे त्यांनी लेखी कळविले आहे.
स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना महिला आघाडीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिलेल्या इशाऱ्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य अधिकारी विनायक दीक्षित व जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे,
किरण मोरे, दत्तात्रय जाधव यांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा खरीप हंगाम मधील सर्व पिकांना व रब्बी हंगाम मधील पीकविमा नुकसानभरपाई देण्याचं कबूल केले आहे. तसे लेखी दिले आहे.
२० जुलैपर्यंत नगर जिल्ह्यातील सर्व पात्र विमापॉलिसी धारक शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई त्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येईल असे त्यांनी लेखी कळविले आहे. २० जुलैपर्यंत नगर जिल्ह्यातील सर्व पात्र विमापॉलिसी धारक शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई त्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येईल असे त्यांनी लेखी कळविले आहे.
यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सुनीता वानखेडे, वर्षा वानखेडे, बाळासाहेब घोगरे, हौशिराम दांगट, विश्वास तनपुरे, संजय विटे, अभिजित यादव, योगेश महांकाळे, मधू काकड, प्रकाश जाधव, भानुदास चोरमल, रवी वानखेडे आदीसह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना साधारण अकराशे कोटींच्या पेक्षा जास्त पीकविमा नुकसानभरपाई मिळणार आहे. स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना महिला आघाडीने जिल्हा कृषी अधीक्षक यांना पाठपुरावा केल्यामुळे नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.