Ahmednagar News : अहमदनगर महानगरपालिका काम गार यूनियनची महापालिका प्रशासनाला दिवाळी सणासाठी सर्व कामगारांना सानुग्रह अनुदान मिळणे कामी संप नोटीस दिलेली होती.
त्यास अनुसरुन सहा. कामगार आयुक्त यांनी २५/६/२०२४ रोजीच महापालिका प्रशासनास पत्र देवून कामगार यूनियन पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेवून सदर प्रश्न निकाली काढण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाची २५ जुलै रोजी कामगार यूनियन पदाधिकारी यांच्याबरोबर संयुक्त बैठक झाली.
यावेळी आयुक्त यशवंत डांगे, कामगार यूनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, उपाध्यक्ष नंदकुमार नेमाने, कार्याध्यक्ष राहुल साबळे, महादेव कोतकर, बलराज गायकवाड, बाबासाहेब राशिनकर,
उपाध्यक्ष अजय सौदे, अमोल लहारे इत्यादी उपस्थित होते. यावेळी मनपा प्रशासनाने कामगारांच्या विविध मागण्या मान्य केल्याबद्दल युनियनच्या वतीने आनंदराव वायकर यांनी आभार मानले.
कामगार युनियन व मनपा प्रशासनाची संयुक्त बैठकीत झालेले निर्णय
३. वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुठलीही जेष्ठता न लावता तात्काळ संबधित कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचे पैसे अदा केले जातील.
४. सफाई कामगारांना कचरा वाहन्यासाठी ढकल गाडी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
५. लवकरच निवड समिती घेण्यात येवून पात्र कर्मचारी यांना पदोन्नती तसेच कालबध्द पदोन्नतीचे लाभ देण्यात येतील.
६. एल.एस. जी.डी./ एल.जी. एस उत्तीर्ण झालेल्या कर्मचारी यांना जादा वेतनवाढी देणे संदर्भात शासनाकडे पत्र पाठवून मार्गदर्शन घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
७. लाड व पागे समिती शिफारशीनुसार तसेच अनुकंपा तत्वानुसार ३०५, ५०६ व ७६ वारस सह पात्र कामगारांच्या वारसाना नोकरी लवकरच देण्यात येईल तसेच ज्यांचे कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांच्याकडून कागदपत्रे यांची
पूर्तता करून घेवून त्यांना देखील लवकरच महापालिका सेवेत नोकरी देण्यात येईल. तसेच मागील निवड समितीमध्ये मंजूर झालेल्या १२/२४ कालबध्द पदोन्नतीचे प्रकरणवार आयुक्त यांनी स्वाक्षरी केलेली असून लवकरच कालबद्ध पदोन्नती मिळालेल्या सुमारे ३०० कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार आहे.