अहमदनगर बातम्या

बंदूक.. तलवार..लोखंडी रॉड.., नगरमध्ये मारहाणीचा थरार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News  : अहमदनगर शहरात मारहाणीच्या अनेक घटना सातत्याने घडल्याचे समोर आले आहे. टोळीयुद्धाचा थराराही नगरकरांनी अनुभवलाय. आता नगर शहरातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

बंदुकीचा धाक दाखवून तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. नवनाथ छगन राठोड (वय २४ रा. वारूळाचा मारुती तालीम जवळ, नालेगाव) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.

त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओमरत्न पुलकेश भिंगारदिवे (रा. नालेगाव), राहुल रोहकले (नालेगाव), मयुर साठे, गणेश पवार, यश पवार, ओम कंडागळे, हेमंत शेलार (पूर्ण नावे नाहीत, सर्व रा. म्युनसिपल कॉलनी, तोफखाना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

नवनाथ राठोड हे त्यांचे मित्र सचिन ठाणगे व प्रशांत भोसले यांच्यासोबत रविवारी (११ ऑगस्ट) रात्री १० वाजता दुचाकीवरून दिल्ली गेट ते अमरधाम रस्त्याने जात असताना गणेश मेडिकलच्या समोर ओमरत्न भिंगारदिवे हा त्याच्या चार ते पाच साथीदारांसह थांबलेला होता.

त्यांनी नवनाथ व त्यांच्या मित्राला अडवले व म्युनसिपल कॉलनी येथे शिवछत्र बिल्डिंगच्या जवळ नेले. ओमरत्न याने नवनाथला शिवीगाळ करून, ‘नागपंचमीच्या दिवशी वारूळाचा मारुती येथे भरलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात तू का गेला’ असे म्हणून कपाळाला बंदुक लावली.

राहुल रोहकले याने नवनाथ यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. मयुर साठे याने धारदार वस्तूने पाठीवर वार केला.

गणेश पवार, यश पवार यांनी लोखंडी रॉडने मांडीवर तर ओम कंडागळे, हेमंत शेलार यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office