अहमदनगर बातम्या

तो अन ती नगरचे..सोबतच जनावरे चारण्यासाठी डोंगरात जायचे..घरच्यांनी लग्नही जमवले..पण त्याने तिच्याशी केले ‘असे’ की..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : ते दोघे एकाच गावातील. सोबतच जनावरे चारण्यासाठी डोंगरात जात होते. घरच्यांनी त्यांची सोईरीकही जमविली. आता आपले लग्नच होणार आहे, मग तुझ्याशी मला शारीरीक संबंध ठेवू दे, असे सांगुन मुलीशी संबंधही ठेवले. काही दिवसांनी लग्नाला नकार दिला.

मुलीने थेट पोलिस स्टेशन गाठले व लग्नाचे आमिष दाखवुन युवकाने फसवणुक करुन अत्याचार केल्याचा गुन्हा युवकाविरुध्द नोंदविला आहे. पाथर्डी शहरापासुन सात ते आठ किलमोमीटर जवळच असणाऱ्या गावात ही घटना घडली.

गावातील एक मुलगी रोज जनावरे चारण्यासाठी गराळ भागात जात होती. तिच्या सोबत गावातील एक युवकही जनावरे चारण्याचे काम करीत होता. दोघेही समव्यवसायी होते. मग घरच्यांनीही निर्णय घेतला की, आता दोघांचा (लग्नाचा) बार उडवुन देवु. युवकाने युवतीशी शारीरीक सबंधही ठेवले. मात्र, अचानक युवकाने लग्न करण्यास नकार दिला.

युवतीने पाथर्डी पोलिस ठाणे गाठले आणि युवकाने लग्नाचे आमिष दाखवुन आत्याचे केल्याची तक्रार दिली आहे. आता पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तालुक्यात अशा घटना वाढत आहेत. मुलींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तालुक्यासह जिल्हाभरात अशा घटना घडताना दिसत आहेत. मुलींची फसवणूक करणे, लग्नाचे आमिष दाखवणे आदी घटना समोर येत आहेत. अशा घटना वाढत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पालकांसह मुलींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

पळवण्याचेही प्रकार
जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकारही वाढत आहेत. विविध आमिषे दाखवून मुलींना पळवून नेले जाते. हे प्रमाण अलीकडील काही दिवसांत वाढले आहे. मागील चार पाच दिवसांत पोलिसांनी अशा अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिल्याचेही घटना समोर आल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office