अहमदनगर बातम्या

शेअर्सच्या नावाखाली अहमदनगरकरांना गंडा घालणारा ‘तो’ दारू अन बिर्याणी झोडत होता, एक ताब्यात बाकी फरार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेअर मार्केटच्या नावाखाली दोन कोटींना गंडा घालणारा आरोपी बिर्याणी पार्टी करत असताना शेवगाव पोलीसांनी सापळा लावून जेरबंद केला. गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट (रा. आंतरवली खु., ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे.

बबन आण्णासाहेब शिरसाठ (रा. नवीन खामपिंप्री, ता. शेवगाव यांच्या फिर्यादीवरुन आंतरवली, खुर्द, ता. शेवगाव जि. अहमदनगर येथे सीडीजी इनव्हेस्टमेंट नावाचे शेअर मार्केट ट्रेडोंग कंपनीच्या नावाखाली एकूण दोन कोटी रुपयांची फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन करुन फसवणूक झाल्याचा गुन्हा शेवगाव पोलीस ठाण्यात दि.१२ ऑगस्टला दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना नमुद गुन्ह्यातील आरोपी हा गंगापूर, जिल्हा-छत्रपती संभाजीनगर भागात आल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक दिगंबर शहाणे यांनी पथकांची नेमणूक केली होती. त्यातील एक पोलीस पथक पैठण भागात तर दुसरे पोलीस पथक गंगापूर येथे रवाना झाले.

गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट (रा. आंतरवली खु. ता. शेवगाव) व त्याचे मित्र गंगापूर ते येवला या रस्त्याच्या कडेला तर्र नशेमध्ये बिर्याणी पार्टी करीत असताना पोलीस पथकाने तेथे धड टाकली. आरोपीस ताब्यात घेतले.

गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट (रा. आंतरवली खु. ता. शेवगाव) यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने लवकरात लवकर अटक करण्यात येणार असून, फरार आरोपींच्या मागावर पोलीस पथके शोध कार्य करीत आहेत.

सदर आरोपीकडून तालुक्यातील कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,

अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. दिगंबर भदाणे, स.पो.नि. धरमसिंग सुंदरडे, पो.हे.कॉ. परशुराम नाकाडे, पो.कॉ. शाम गुंजाळ आदींच्या पथकाने केली.

Ahmednagarlive24 Office