Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ पोलीस ठाण्याचा हेड कॉन्स्टेबल लाचलुचपतच्या सापळ्यात

Pragati
Published:
lachluchapat

Ahmednagar News : लाच घेणे व लाच देणे हे दोन्हीही कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असतात. लाच ही आपल्या यंत्रणेला लागली गेलेली भ्रष्ट कीड आहे. लाचलुचपतने याआधीही अनेक कारवाया करत अहमदनगरमधील अनेक विभागातूल विविध कर्मचारी जाळ्यात घेतलेले आहेत.

परंतु तरीही लाच घेण्याचे प्रकार कमी होतानाचे चित्र नाही. आता पुन्हा एकदा एक लाचेचे प्रकरण समोर आलेले आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशीवरून कारवाई न करण्यासाठी पाच ते दहा हजारांची लाच मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वीर असे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्या अंमलदाराचे नाव असल्याची माहिती समजली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील इसमाने नगरच्या ‘एसीबी’कडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, काही महिन्यापूर्वी शेवगाव पोलीस ठाण्यातील अंमलदारास लाच घेताना पकडले होते. आता पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसीमधील कर्मचारी कोटभर रुपये लाच घेताना पकडले गेले असल्याची घटना ताजीच आहे.

या घटनेने महाराष्ट्रभर खळबळ उडून दिली होती. यातील आरोपी देश सोडून पाळण्याच्या तयारीत होता अशाही बातम्या त्यावेळी येत होत्या. नगरमधून लाचेच्या गुन्ह्यात अडकणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe