Ahmednagar News : एसटी बस व टेम्पोच्या भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे. नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. यामध्ये पारनेरचे पाच जण जखमी झाले आहेत.
या अपघातात टेंपोतील चालकासह पाच जण जखमी झाले. या अपघातात टेंपोचालक अरुण बाबूराव सर्से, भाऊसाहेब करकुंबे, अमन अरुण सर्से, मोनिका अरुण सर्से, माई अरुण सर्से सर्व रा. पारनेर तालुका) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
ओतूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री आठ वाजता नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीत कल्याण नगर पाथर्डी ही एसटी बस कल्याणकडून ओतूरकडे येत होती.
त्याचवेळी ओतूरकडून कल्याणच्या दिशेने चाललेल्या टेंपोची पिंपळगाव जोगा गावच्या हद्दीत धडक झाली. या अपघातात टेंपो उलटा झाला. टेंपोमधील लोक कल्याण येथे लग्नाला चालले होते. यावेळी ही घटना घडली.
पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मागील काही दिवसांत अपघातांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक झाले आहे.
वाढती वाहनांची संख्या व त्या तुलनेत अपुरे रस्ते, रस्त्यांची दुरवस्था, अनियंत्रित वेगात वाहने चालवणे आदी गोष्टी याला कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे अपघतांची संख्या वाढली असून यातील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे.
दरम्यान वरील अपघाताची माहिती समजताच स्थानिक लोकांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना व इतरांना मदतकार्य देखील केले होते. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली होती.