अहमदनगर बातम्या

नगरमध्ये किती मतदार? कोणता वयोगट आमदार ठरवणार? ११९ वर्षाचेही मतदार, पहा सविस्तर माहिती..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आगामी विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. सर्वच पक्ष , इच्छुक उमेदवार यांनी पायाला भिंगरी लावून कामाला सुरवात केली आहे. या आगामी विधानसभेला मतदान नोंदणी अभियान सुरु आहे. या नुसार आता ३० ते ४० वयोगटातील मतदार सर्वाधिक असून हेच आमदार ठरवतील असे दिसतेय.

मतदान नोंदणी अभियानात जिल्ह्यात ६८ हजार ५९८ नवीन मतदार वाढले असून, विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीचा दुसरा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. यानुसार आज, शुक्रवारी जिल्हा निवडणूक विभागाकडून अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

यादीवर दावे व हरकती घेण्यात आले आहेत. नगर शहरातून २४ हजार १९९ मतदारांची नावे दुबार, तिबार आढळून आली असून, नगर शहरातून ५१ हजार १२३ मतदारांना नोटिसा बजावल्या आहेत.

यानुसार १० सप्टेंबरपर्यंत त्यांना म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुरवणी यादीत, सुनावणीनुसार मतदार यादीत सुधारणा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत ३६ लाख ५९ हजार २०१ मतदारांची नोंद करण्यात आली होती. आता विधानसभेसाठी २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत ३७ लाख २७ हजार ७९९ मतदारांची नोंद झाली असून, ६८ हजार ५९८ नवीन मतदार वाढले आहेत.

३० ते ३९ वयोगटातील ८ लाख मतदार
३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या जास्त आहे. ८ लाख ५ हजार ६७१ इतके मतदार या वयोगटातील आहेत.

१७५० मतदार @ १०० वयाचे
जिल्ह्यात १७५० इतक्या उमेदवारांनी शंभरी पार केली आहे. यामध्ये ११९ वयाचे एक, तर १२० पेक्षा अधिक वयाचे दोन मतदार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office