Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवारची किती कामे पूर्ण झाली? किती कामांना लागला ब्रेक? पहा एक रिपोर्ट

Ahmednagarlive24 office
Published:
jalayukt shivar

Ahmednagar News : जलयुक्त शिवार या सरकारी योजनेची नेहमीच चर्चा होत असते. यामधून झालेल्या कामांमुळे अनेक ठिकाणे पाण्यामुळे समृद्धही झाल्याची उदाहरणे आहेत. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुतीचे सरकार आले व त्यांनी जलयुक्त शिवार योजना पुन्हा नव्याने सुरू केली गेली.

या योजनेतील ७ हजार ४९९ कामे सुरू असून त्यापैकी ४ हजार ५९१ कामे पूर्ण झाली आहेत. या पूर्ण झालेल्या कामांमुळे २०९५ स.घ.मी पाणीसाठा निर्मित झाल्याची माहिती लघू पाटबंधारे विभागाने दिली असल्याची माहिती एका मीडियाने दिली आहे. दरम्यान, आता लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ८ हजारावर कामे ठप्प झाली असल्याचे बोलले जात आहे.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी १५ हजार १४४ कामांना दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ६० कामे पूर्ण करण्यात आली असून, २ हजार ९०८ कामे सुरू असली तरी, आचारसंहितेत प्रशासकीय मान्यता आणि वर्क ऑर्डर बाकी असलेल्या ८ हजार ७४ कामांना ब्रेक लागला आहे.

जलयुक्त शिवार अभियानंतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील ३६८ गावांची निवड करण्यात आली असून, १८ हजार ७०३ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी २४० कोटींची मंजूरी देण्यात आली आहे. त्यामध्ये विविध १५ हजार ५७३ कामांना १५८ कोटी १४ लाख ६४ हजार रुपयांची तांत्रिक मंजूर देण्यात आली.

त्यापैकी १५ हजार १४४ कामांना १४२ कोटी २७ लाख ९९ लाख रुपयांची दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत ४ हजार ५९१ कामे पूर्ण करण्यात आली असून २ हजार ९०८ कामे सुरू आहेत.

इतर कामांचाही श्रीगणेशा 
निवड करण्यात आलेल्या ३६८ गावांमध्ये पाणलोट विकासाची कामे करून गावे जल परिपूर्ण करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे, कृषी विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, ग्रामपंचायत कार्यालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण

या विभागामार्फत नवीन साठवण तलाव, माती नाला बांध, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पाझर तलाव यांची दुरुस्ती, नाला खोलीकरण, सलग समतल चर, शेततळी, वृक्ष लागवड, गैबीयन बंधारे, संयुक्त गैबीयन बंधारे आदी कामे प्रस्तावित आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe