अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये आतापर्यंत जलयुक्त शिवारची किती कामे? किती खर्च? किती टीसीएम जलसाठा वाढला? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प. जलयुक्त शिवार टप्पा दोन अभियानात राज्यातील अनेक भागात कामे झाली. त्यात अहमदनगर जिल्ह्यात जास्त कामे झाली आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता ४५ टक्के म्हणजे ७ हजार ७५० कामे पूर्ण झाली आहेत. ही आकडेवारी जुलैपर्यंतची आहे. जलसंधारणच्या या कामांमुळे तब्बल २ हजार १४० टीसीएम जलसाठा निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सुरू केली.

फेब्रुवारी महिन्यात जलयुक्त शिवारचा आराखडा तयार करण्यात आला. ३७८ गावांची त्यासाठी निवड करण्यात आली. या गावांमध्ये १७ हजार १३९ कामे प्रस्तावित करून त्यासाठी २०७ कोटी ५६ लाख १८ हजार रुपयांच्या कामांचा आराखडा केला.

किती खर्च?
आतापर्यंत १७ हजार १३९ कामांपैकी १६ हजार ७०८ कामांना तांत्रिक मंजुरी तर १६ हजार ३७४ कामांच्या १५३ कोटी ७४ लाख ७० हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ११ हजार ९५ कामे सुरू करण्यात आली असून त्यापैकी ७ हजार ७५० कामे पूर्ण झाली आहे. या पूर्ण झालेल्या कामांमुळे २ हजार १४० टीसीएम पाणीसाठा आता निर्माण होणार आहे.

पावसामुळे कामे ठप्प
११ हजार ९५ कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी ३ हजार ३५० कामे अद्यापही पूर्ण झालेली नाही. पावसामुळे ही कामे ठप्प असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच १६ हजार ७०८ कामांना प्रशासकीय मान्यता दिली असली तरी त्यापैकी ११ हजार ९५ कामे सुरू झाली आहे.

परंतू उर्वरित ५ हजार ६१३ कामांना अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. ही कामे ऑक्टोबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

७ हजार ७५० कामे पूर्ण झाली असून या कामांवर ४३ कोटी ७३ लाख १४ हजार रुपये खर्च झाला आहे. कृषी विभागाची सर्वाधिक कामे झाली आहे. ५ हजार ६९७ कामे पूर्ण झाली आहेत.

Ahmednagarlive24 Office