IAS पूजा खेडकरला नगरमधील रुग्णालयातूनच दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं ! अभिलेख तपासणीत समोर, कोणी दिले ? कसे दिले?

त्यांना देण्यात आलेलं दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातूनच दिले गेल्याचे समोर आले आहे. अभिलेख तपासणीमध्ये काही गोष्टी समोर आल्या असून त्यातच ही माहिती समोर आली आहे.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या मागील काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचेही अनेक कारनामे समोर आले आणि राज्यात चर्चेचा विषय सुरु झाला. दरम्यान त्यांनी मिळवलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आणि नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेटबाबत वाद निर्माण झाला.

आता त्यांना देण्यात आलेलं दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातूनच दिले गेल्याचे समोर आले आहे. अभिलेख तपासणीमध्ये काही गोष्टी समोर आल्या असून त्यातच ही माहिती समोर आली आहे. 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र, 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र, 2021 मध्ये डोळे व मानसिक आजाराचे एकत्रित प्रमाणपत्र देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांनी माहिती दिली की, शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासल्यानंतर या नोंदी आढळल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव (ता. पाथर्डी) येथील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची पूजा खेडकर ही मुलगी.

पूजा खेडकर या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे यूपीएससी परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्यात. दरम्यान पुण्यात प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना वाहनावरील लाल दिवा, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हस्तक्षेप आदींसह अनेक कारणाने त्या चर्चेत आल्या व त्यांची तेथून वाशीम या ठिकाणी बदली झाली. त्यानंतर अनेक वाद समोर आले.

नॉन क्रेमिलिअर’ बाबत प्रांत घेतंय शोध
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आयएएस होते. दरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रात आपली संपत्ती ४० कोटींची आहे असे म्हटले होते. ही संपत्ती असताना देखील पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गात नॉन क्रेमिलिअरचे प्रमाणपत्र घेतले आहे का? अशीही शंका आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांनी आमच्याकडून हे प्रमाणपत्र घेतले आहे का याबाबत आम्ही तपासणी करत आहोत असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, पूजा यांनी नियमानुसारच दिव्यांग व क्रेमिलिअरचे प्रमाणपत्र घेतले आहे. त्याची तपासणी यूपीएससीने केली असल्याचे दिलीप खेडकर यांचे म्हणणे आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe