अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरधील शेतकऱ्यांचा आदर्श प्रयोग, इल्लाकी केळीची यशस्वी लागवड, एकरी चार लाखांचे उत्पन्न

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आता विविध प्रयोग करू लागले आहेत. शेतीला तंत्रज्ञानाची आधुनिकतेची जोड देत विविध प्रयोग राबवू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील मागील काही दिवसांचा अढावा घेतला तर जिल्ह्यात सफरचंद लागवड, काळ्या गव्हाची लागवड आदी पिके यशस्वीपणे घेतली आहेत.

हे सर्व प्रयोग नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांसाठी एक आदर्शवत ठरत आहेत. आता अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी इल्लाकी केळीची यशस्वी लागवड केली असून यातून लाखोंचे उत्पन्न मिळण्याची अशा त्यांना आहे.

हे शेतकरी तालुक्यातील रत्नापूर येथील आहेत. चंद्रशेखर मोरे, दत्तात्रय वारे, प्रवणकुमार मोरे, किरण काशीद अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. या चौघा शेतकऱ्यांनी १२ एकर क्षेत्रात तालुक्यात प्रथमच इल्लाकी केळी लागवड केली. या केळीची जातीचे उत्पादन प्रामुख्याने तमिळनाडू राज्यात घेतले जाते, मात्र या शेतकऱ्यांनी तालुक्यात प्रयोग केलाय. यातून त्यांना एकरी ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

रत्नापूर येथे चंद्रशेखर मोरे, दत्तात्रय वारे, प्रवणकुमार मोरे, तर जामखेड येथे किरण काशीद यांची अनुक्रमे ३ एकर, ४ एकर, ३ एकर, २ एकर शेती आहे. त्यात ते ऊस, कांदा, पिकांचे उत्पादन घेत जात होते.

मात्र, हे पीक घेण्यासाठी खर्चही भरपूर करावा लागत असल्याने पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून या सगळ्यांनी एकत्रित मिळून १२ एकर इल्लाकी केळीची सेंद्रिय पद्धतीने लागवड करायचा निर्णय घेतला. एकरी १ हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली.

यासाठी रोपे, खाते, हार्वेस्टर व इतर बाबी धरून एकरी एक ते दीड लाखापर्यंत खर्च करून एकरी ४५ ते ५० टनपर्यंत उत्पादन होत आहे. या केळी लागवडीतून त्यांना एकरी चार लाख रुपयांपर्यंत उत्पादन मिळाले. त्यांनी १२ एकरात चौदा हजार चारशे केळी घेतल्या. नियोजन करून त्याची योग्य निगा राखली, म्हणून चांगले उत्पादन मिळाले.

Ahmednagarlive24 Office