Ahmednagar News : ‘नवऱ्याला मॅसेज करतेस,सुपारी देऊन मारील’, महिला डॉक्टरची परिचारिकेला घरात घुसून रॉडने मारहाण, अहमदनगरमधील घटना

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील एका महिला डॉक्टरने परिचारिकेस घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमधूनच ही घटना समोर आली आहे.

ही घटना शुक्रवारी (दि. २४) रात्री आठ वाजता घडली. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास डॉ. माधुरी जगताप परिचारिकेच्या घरी गेली. “तू माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस?” अशी विचारणा तिने परिचारिकेस केली. “माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही, मी कशाला मॅसेज करू” असे परिचारिकेने सांगितले.

मात्र तरीही डॉ. जगतापने हातातील पाईपमध्ये लोखंडी गज टाकून परिचारिकेच्या कपाळावर, डोक्यात, डाव्या हाताच्या मनगटाजवळ, उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारहाण केली परिचारिकेस जखमी करून केस धरून खाली पाडले. गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले. “पुन्हा जर नादी लागली तर फाशी देऊन मारीन”. “गावात राहिली तर सुपारी देऊन मारून टाकीन”.

“कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही”, अशी धमकी डॉ. जगतापने दिल्याचे परिचारिकेने फिर्यादीत म्हटले आहे. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून महिला डॉक्टरनं परिचारिकेला घरात घुसून लोखंडी रॉडनं मारहाण केल्याने आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. धक्कादायक म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या परिचारिकेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप यांच्या विरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe