अहमदनगर बातम्या

अवघ्या काही दिवसांपूर्वी लग्न, झाडावर ‘अशा’ अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नवीन दाम्पत्य.. तीन महिन्यापूर्वी लग्न झालेलं.. दोघेही नोकरीला होते.. पण त्या दोघांचाही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. झाडाला गळफास लावून जीवन संपवल्याची खळबळजनक घटना संगमनेरमध्ये घडली.

तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या जोडप्याचा अशा अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (ता. ११) दुपारी ही घटना घडली. वैभव आमले आणि स्नेहा आमले असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

समजलेल्या माहितीनुसार, मृत वैभव आमले आणि स्नेहा आमले हे दोघेही संगमनेर तालुक्यातील साकुर येथे राहणारे होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही पुणे शहरात असणाऱ्या कंपनीत नोकरीसाठी जात होते. परंतु अचानक नुकतेच दोघेही अचानक गावाकडे आले होते.

दरम्यान मुळा नदीच्या जवळील मांगमळीत या दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका नागरिकास दिसले. त्याने आरडाओरड करत लोक जमा केले. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वैभव आणि स्नेहाच्या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.

अनेक नागरिकांनी तेथे धाव घेतली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देत कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्या ठिकाणी येताच दोघांचेही मृतदेह खाली काढले.

शवविच्छेदनासाठी दाम्पत्याचे रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. मृत वैभव आमले आणि स्नेहा आमले हे दोघेही संगमनेर तालुक्यातील साकुर येथे राहणारे होते.

ही घटना कशामुळे घडली? इतके टोकाचे पाऊल त्यांनी का उचलले? याचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Ahmednagarlive24 Office