Ahmednagar News : ‘आषाढी वारी ‘ साठी लाल परी सज्ज ; तब्बल ४८०० एस.टी.गाड्यांची केली व्यवस्था

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या ‘पंढरी’त येतात. यंदा ‘आषाढी वारी ‘ला १७ जून पासून सुरुवात होणार आहे.
या पार्श्वभूमीवर लाल परी सज्ज झाली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ४८०० एस.टी.गाड्यांची व्यवस्था केली आहे. १ जुलैपासून पंढरपूरकडे एस.टी. महामंडळाच्यावतीने गाड्या सोडण्यात येणार आहेत.
२५ जुलै पर्यंत गाड्या सुरू राहणार असून राज्यातील एकूण ३० विभागातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ८०० एस.टी. बसेस जादा सोडण्यात येणार आहेत.

आषाढी वारीच्यानिमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी १५ ते १६ लाख भाविक ‘पंढरी’त दाखल होतात. विठू नामाचा गजर करत दाखल झालेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासाच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने राज्यभरातून ४८०० एस.टी.गाड्यांची व्यवस्था केली आहे. या गाड्या एकूण ४९०० फेऱ्या करणार आहेत. दरम्यान, सवलतीच्या तिकीट दरामुळे महिला वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा ८०० गाड्या जादा सोडण्यात येणार आहेत.

‘आषाढीवारी’च्या अनुषंगाने महाराष्ट्रसह तेलंगणा,आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यातील भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येत असतात. यात पायी चालत येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. पायी चालत येणाऱ्या भाविक विठु दर्शनानंतर विविध वाहनांद्वारे परत गावी परततात. या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळ दरवर्षी ४ हजार एस.टी. बसेस्ची व्यवस्था करत असते.
यंदा यात वाढ गाड्या घेण्यात करण्याबरोबरच महिला भाविकांसाठी ८०० जादा सोडण्याचा निर्णय आला आहे. ६५ वर्षावरील नागरिकांना अर्ध्या तिकिटाची सेवा दिली जात आहे. महिलांना १७ मार्च २०२३ पासून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.
सोलापूर विभागातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी २२० गाड्यांचेनियोजन करण्यात आले आहे. एकूण ४९०० फेऱ्या करण्याचे एस.टी. महामंडळाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार एस.टी. महामंडळाकडून नियोजन केले जात आहे.
एस.टी. महामंडळाचे जर योग्य नियोजन झाले तर महामंडळाला वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा नफा मिळेल. यासाठी राज्यभरातून प्रयत्न केले जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe