अहमदनगर बातम्या

नागवडे कारखान्यास नोंदणीकृत गहाणखत न करताच १५ कोटींचे कर्ज? तपासणीचे आदेश

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर जिल्ह्यात अनेक साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना वेळोवेळी कर्जपुरवठा केला जातो.

आता हे कारखाने व कर्जपुरवठा याबाबत एक माहिती समोर आली आहे. जिल्हा सहकारी बँकेने विविध कारखान्यांना दिलेल्या कर्ज प्रकरणांबाबत सहनिबंधकांच्या आदेशावरून विशेष लेखापरीक्षकांनी तपासणी सुरू केली आहे.

दरम्यान यात नागवडे कारखान्याचाही समावेश असल्याचे समजले आहे. दरम्यान, सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेताना सर्व नियमांचे पालन केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी एका मिडियाशी बोलताना दिली.

जिल्हा सहकारी बँकेने विविध कारखान्यांना दिलेल्या कर्ज प्रकरणांबाबत सहनिबंधकांच्या आदेशावरून विशेष लेखापरीक्षकांनी तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत नागवडे साखर कारखान्यास नोंदणीकृत गहाणखत करून न घेता १५ कोटी रुपयांचे मध्यम मुदतीचे कर्ज देण्यात आले, या मुद्याचा समावेश आहे.

यासंदर्भात बोलताना नागवडे म्हणाले, विभागीय सहनिबंधकांनी कोणत्या मुद्यांची चौकशी सुरू केली याची आपणास कल्पना नाही. मात्र, नागवडे कारखान्याने जिल्हा बँकेकडून नियमानुसारच कर्ज घेतलेले आहे.

या कर्जापोटी बँकेला गहाणखतही करून दिलेले आहे. त्याचे कागदोपत्री पुरावेही कारखान्याकडे आहेत.

अजित दादांचे निकटवर्तीय
नागवडे कुटुंबीय हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. आगामी विधानसभा निवडणुकांत ते आमदारकीसाठी देखील इच्छुक आहेत.

श्रीगोंदेत काहीही झालं तर लढायचंच असा निश्चय नागवडे कुटुंबीयांनी केला आहे.

Ahmednagarlive24 Office