Ahmednagar News : राज्यात नावलौकिक असलेल्या श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी मळगंगा पॅनलने २० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाले तर विरोधी माऊली मळगंगा पॅनल १ जागा मिळाली.
सकाळी ८ वा. सुरू झालेले मतदान सायंकाळी ४ वाजता संपले. ४.१५ वाजता सुरु झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालली. रात्री १२ वा. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर कवाद यांनी निवडणूक निर्णय जाहीर केला, त्यांना देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे यांनी सहाय्य केले. २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते,.
श्री मळगंगा पॅनलचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते : वसंत बाबाजी कवाद (७९५ मते), विठ्ठल भाऊसाहेब कवाद (७२४), शांताराम बापू कळसकर (६३५), लक्ष्मण रामभाऊ ढवळे (६४१), अमृता महादू रसाळ (७५१), संतोष भाऊ रसाळ (७१३), शांताराम भाऊ लंके (७९१), ज्ञानेश्वर दगडू लंके (५८५), ठकाराम बाळू लंके (७४०), अनिल रघुनाथ लंके (७५४), शंकर चंद्रकांत लामखडे (७०९), ज्ञानेश्वर रामदास लामखडे (६७७), रोहिदास हरिभाऊ लामखडे (५९३), दिलीप यशवंत लाळगे (५५६ पराभूत), मंगेश सखाराम वराळ (५६०), सिमा संदीप वराळ (७३७), रामदास महादू वरखडे (६९१), अशोक बापू वरखडे (५७८), मोहिनी सोमनाथ वरखडे (५८१), विश्वास ठकाराम शेटे (६८०), रामदास नानाभाऊ ससाणे (६५८) हे २१ उमेदवार असून, यातील २० विजयी झाले.
विरोधी माऊली मळगंगा परिवर्तन पॅनलचे उमेदवार मोहन जयवंत कवाद (३६९ मते), शांताराम ठकाराम ढवळे (३४६), सुनिल रघुनाथ पवार (३७५), शिवाजी लक्ष्मण भुकन (२६२), मनोहर बाबाजी राऊत (४०५), दत्तात्रय श्रीपत लंके (३४६), देवराम गोविंद लामखडे (४३९),राजेंद्र भागा लाळगे (५१६), संतोष खंडू वराळ (२७८), राहूल भाऊसाहेब वराळ (३१४), रावसाहेब आनंदा वराळ (३४८), ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे (५३९), संदीप रामचंद्र वरखडे (३७१), अनिल शिवाजी शेटे (एकमेव विजयी), ६३०) हे १४ उमेदवार तर सर्व पराभूत अपक्ष उमेदवारांमध्ये काळूराम सहदेव गजरे (३९), सदानंद भिकाजी ढवळे (३३), दिलीप रामचंद्र ढवण (५५), रुपेश मारुती ढवण (५४), दत्तात्रय खंडू भुकन (१८२), गणेश चंद्रकांत वराळ (६४), यांचा समावेश आहे.
निवडणूकीत गडबड, गोंधळ होवू नये म्हणून पारनेर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे दिलीप यशवंत लाळगे हे ७६ मतांनी पराभूत झाले, तर विरोधी माऊली मळगंगा परिवर्तन पॅनलचे अनिल शिवाजी शेटे हे ७६ मतांनी एकमेव उमेदवार निवडून आले. सत्ताधारी मळगंगा पॅनलचे नेतृत्व बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद, माजी सरपंच ठकाराम लंके, कन्हैय्या परिवाराचे अध्यक्ष शांताराम लंके यांनी केले, तर विरोधी माऊली मळगंगा पॅनलचे नेतृत्व संदीप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुनिलराव पवार, मळगंगा यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव लंके यांनी केले. देवस्थान ट्रस्टचे ११८१ सभासद असून, प्रत्यक्षात १०६९ म्हणजे शेकडा ९२.६३ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला, २५ मते बाद झाली.