अहमदनगर बातम्या

स्व.मा.खा. दिलीप गांधींचा मुलगा सुवेंद्र गांधींबाबत न्यायालयाचे मोठे आदेश, ‘ते’ पैसे नाहाटांनी घेतले?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :  नगर अर्बन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी व नवी दिल्ली येथील खटल्यातील कलम १३८ अन्वये आरोपी असलेल्या सुवेंद्र गांधी यांना ५० लाख रुपये ६० दिवसाच्या आत भरण्याचे नवी दिल्ली न्यायालयाने आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दिल्लीतील गणपती ट्रेडर्स संस्थेकडून घेतलेल्या १८ कोटीच्या रकमेची परतफेड करताना ८ कोटीचा दिलेला धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटला गेला नाही. त्यामुळे त्या संस्थेने न्यायालयात कलम १३८ अन्वये सुवेंद्र गांधीविरुद्ध खटला दाखल केला होता.

त्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना दोन महिन्यात ५० लाख रुपये भरण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येते. यावेळी न्यायालयाने आरोपीची चालढकल करण्याची वृत्ती,

वारंवार वेगवेगळी भूमिका घेणे, कोर्टात नेहमी गैरहजर राहणे, फरार होणे, दंडाची रक्कम न भरणे या बाबींमुळे नाराजी व्यक्त केल्याचेही समजते.

पैसे नहाटांनी घेतले?
याबाबत माहिती देताना सूत्रांकडून सांगण्यात आले की, या खटल्यात आरोपीचे म्हणणे होते की चेकवरील सही माझी आहे, परंतु घेतलेली रक्कम प्रवीण उर्फ बाळासाहेब नहाटा यांनी घेतलेली आहे.

माझे दिवंगत पिता (स्व. दिलीप गांधी) यांनी या व्यवहारात मध्यस्थी केली होती व माझे चेक बुक माझ्या वडीलांकडे होते. त्यांनी ते चेक गॅरंटी म्हणून दिले होते. परंतु न्यायालयाने ही भूमिका अमान्य केली. व्यवहारातील रक्कम सुवेंद्र गांधी याच्या खात्यात गेल्याचे स्पष्ट होत आहे व एवढा मोठा व्यवहार कोणी दुसऱ्यासाठी अशा पद्धतीने करणे अशक्य वाटते,

असे स्पष्ट केले. तसेच नियमानुसार २० टक्के रक्कम भरून घेण्याची तरतूद असताना रकमेचे स्वरूप मोठे असल्याने आरोपीला सुरुवातीचा परतफेड हप्ता म्हणून ५० लाख ६० दिवसात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्याची पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Ahmednagarlive24 Office