Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील खर्डा येथलि विशाल ईश्वर सुर्वे या युवकाचा अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी डोक्यात कसल्यातरी टणक वस्तुने जबर वार करून खून केल्याची घटना घडली आहे.
याप्ररणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत फिर्यादी सुशेन सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विशाल सुर्वे हा शुक्रवारी खर्डा येथील एका व्यापाऱ्याचा माल आणण्यासाठी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे गेला होता.
रात्री अकरा वाजता खर्डा येथील व्यापाऱ्याकडे माल उतरविला व घरी जात असताना, रात्री साडे अकराच्या सुमारास सुर्वे वस्ती रोडवरील लक्ष्मीआई मंदिराच्या मागे कच्च्या रस्त्यावर अज्ञात इसमांनी लोखंडाच्या टणक वस्तुने डोक्यास डाव्या बाजूला जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.
ही घटना सकाळी उघडकीस आली. घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.