Ahmednagar News : जिरायती भागात पाणी, चारा दुधाचे भावात घसरण झालेली आहे. याचा परिणाम अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील गायींच्या बाजारांमध्ये दिसून येत आहे. गायींची महाराष्ट्रात खरेदी-विक्री सध्या मंदावली असल्याचे दिसून येत आहे.
पठार भागावरील कान्हूर पठार, पिंपळगाव तुर्क, विरोली, वेसदरे, भोई, पिंपळगाव रोठा, पिंपरी पठार, वडगाव दर्श, गारगुंडी यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात शेतीला जोड धंदा माणून शेतकरी गाय पाळतात दुधाला योग्य भाव मिळाला की घरातील आर्थिक बाबीला त्याचा हातभार लागतो.
गेल्या वर्षीच्या कमी पावसाचा परिणाम मध्या सर्वत्र जाणवत आहेत. उष्णतेचा पारा चांगलाच वाढल्याने जिरायती भागात चारा व पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. या बरोबरच काही दिवसांपासून दुधाचे चढलेले दर, दुष्काळी परिस्थिती, चान्याचा प्रश्न, पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे नवीन गाय घेण्याकडे शेतकरी इच्छुक दिसत नाही.
दरम्यान बागायत भागातील शेतकरी वर्गाकडून गाय खरेदीचे प्रमाण कमी झालेले असताना व गायीच्या किमती अल्प होऊन देखील जिरायती भागातील शेतकरी गाय खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.
आठवड्यातील ठराविक दिवसात हा बाजार भरला जातो, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये हा गायीचा बाजार भरला जातो. आळेफाटा (ता. जुन्नर), कष्टी (ता.श्रीगोंदे), घोडेगाव या ठिकाणी हा बाजार भरला जातो. येथे अनेक व्यापारी व शेतकरी गाय खरेदीस व विक्रीस येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून यास अल्प प्रतिसाद मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारांमध्ये आम्ही गाय खरेदी विक्री साठी जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून सव्वा लाख रुपयांची गाय साठ ते पासष्ट हजार रुपयांना शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. मात्र शेतकरी वर्गाचा त्यास प्रतिसाद मिळत नाही असे काही व्यापारी सांगत आहेत.