Ahmednagar News : प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या शिर्डीतील ३३५ व अकोलेतील १४ हॉटेलना प्रदूषण नियामक मंडळाकडून नोटिसा बजावण्या आल्या आहेत. प्रदूषण नियामक मंडळाच्या या धडक कारवाईने हॉटेल, रेस्टॉरंट मालकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी प्रदूषण नियामक मंडळाचा परवाना आवश्यक असतो अथवा जे सुरु आहेत त्यांना प्रदूषण नियामक मंडळाचा दाखल असने बंधनकारक आहे. कारण हॉटेल, रेस्टॉरंटमधील प्लास्टिकसह अन्य घातक कचरा आणि तेथील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्यास मानवी आरोग्यासह पशुपक्ष्यांच्या जीवालाही धोका संभवतो.
त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल सुरू करण्यापूर्वी त्यांना प्रदूषण नियामक मंडळाचा परवाना बंधनकारक आहे. मात्र अनेकजण असा परवाना घेण्यास टाळाटाळ करतात.आजही नगर शहरासह जिल्ह्यातील हजारो हॉटेल व रेस्टॉरंट हे प्रदूषण मंडळाच्या परवान्याशिवाय सुरू आहेत.
यातील अकोलेतील १४ आणि शिर्डीतील ३३५ हॉटेलना प्रदूषण नियामक मंडळाकडून नोटिसा बजावण्या आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे नगर येथील उपप्रादेशिक कार्यालयातून हॉटेल्स, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, स्टोन क्रेशर यांसह औद्योगिक क्षेत्रामधील साखर कारखाने, उद्योगांद्वारे प्रदूषण होऊ नये, यासाठी नियंत्रण ठेवले जाते.
याबाबत वेळोवेळी पाहणी करून त्यांना सूचना केल्या जातात. या पाहणीत काही त्रुटी आढळून आल्यास त्या त्रुटींची पूर्तता करून घेतली जाते. प्रसंगी नोटिसा आणि दंडात्मक कारवाईची केली जाते. अशाच प्रकारे अकोले आणि शिर्डी येथील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील नियोजनाअभावी प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी कार्यालयापर्यंत पोहोचल्या होत्या.
शिवाय संबंधितांनी प्रदूषण नियामक मंडळाचे परवानेही घेतलेल नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे उपक्षेत्रिक अधिकारी शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अकोल्यातील १४ आणि शिर्डीतील ३३५ हॉटेल्स, रेस्टॉरंटना नोटिसा बजावत परवान्याची विचारणा केली आहे. याबाबतचा खुलासा मागाविण्यात आला आहे. प्रदूषण नियामक मंडळाच्या या कारवाईने विनापरवाना सुरू असलेली हॉटेले, रेस्टॉरंट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.